Gadchiroli Naxal attack: 15 पोलिसांचा बळी घेणाऱ्या हल्ल्याचा 'मास्टरमाईंड' समजला?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:14 PM2019-05-02T15:14:17+5:302019-05-02T15:23:35+5:30
नंबला केशव राव उर्फ बसवराज हा या नक्षलवादी हल्ल्यामागे मास्टरमाईंड असल्याची शक्यता गडचिरोली पोलिसांनी वर्तवली आहे.
गडचिरोली - गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली 36 वाहनं जाळली. तसेच १ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना शहीद झाले आहेत तर १ वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं. नंबला केशव राव उर्फ बसवराज हा या नक्षलवादी हल्ल्यामागे मास्टरमाईंड असल्याची शक्यता गडचिरोली पोलिसांनी वर्तवली आहे.
गडचिरोली पोलिसांच्या प्राथमिक तपासात, कालच्या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी आयएडीचा वापर करून खाजगी बस उडविली होती. या हल्ल्यत बसवराजचा सहभाग असण्याची शक्यता असून तो बंदी घातलेल्या सीपीआयचा (माओवादी) प्रमुख आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराजने हल्लाच्या नियोजित कट रचला आणि महाराष्ट्र व छत्तीसगढमधील नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. असं म्हणतात की, बसवराजने महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या स्थानिक नक्षल युनिट्सना हल्ला करण्यास सांगितलला. हल्ल्याची घटना कळताच बसवराज छत्तीसगढच्या अबुझामद जंगलात लपून बसला असल्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी छत्तीसगढमधील पोलिसांशी या हल्ल्याप्रकरणी पुढील तपासासाठी संपर्क साधला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्य मंत्रिमंडळास भेटून गडचिरोली हल्ल्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती दिली. तसेच "आजच्या कॅबिनेट बैठकीत आम्ही ज्या गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यात जवान शहीद झाले. या हल्ल्याबाबत चर्चा केली. डीजीपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी गेले आहेत. घटनास्थळी तपास झाल्यानंतर आमची तपशीलवार बैठक होईल. मी आज घटनास्थळी भेट देणार आहे, असे पुढे मुख्यमंत्री म्हणाले.गडचिरोलीमध्येपूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक गावांमध्ये लावण्यात आले आहेत. पोलिसांचा असा अंदाज आहे की, काही स्थानिकांनी देखील हा हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांना मदत केलेली असावी.
Maharashtra: Naxal banners spotted near the site of Gadchiroli naxal attack, in which 15 security personnel and 1 driver lost their lives yesterday. pic.twitter.com/eqcHIFZRs9
— ANI (@ANI) May 2, 2019
काल भ्याड हल्ला, आज धमकी; भूसुरुंग स्फोटानंतर नक्षल्यांची बॅनरबाजी