उच्चभ्रू महिलांना धमकावणारा गजाआड, कारपेंटर बनून करायचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:49 AM2022-09-19T09:49:14+5:302022-09-19T09:49:37+5:30

सुतारकाम करण्याच्या बहाण्याने करायचा कॉल

Gajaad, who intimidates elite women, pretends to be a carpenter | उच्चभ्रू महिलांना धमकावणारा गजाआड, कारपेंटर बनून करायचा कॉल

उच्चभ्रू महिलांना धमकावणारा गजाआड, कारपेंटर बनून करायचा कॉल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्चभ्रू वस्तीतील घरांमध्ये लँडलाइनवर कॉल करून तेथील महिलांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला गावदेवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इम्तियाज अब्दुल खुर्दुस अन्सारी (४९)  असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

इम्तियाज पेडर रोड येथील एका व्यावसायिक महिलेच्या घरी लँडलाइनवर कॉल करून धमकावत होता. याप्रकरणी महिला व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी खंडणी, विनयभंग व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.  कुर्ला कमानी येथील रहिवासी असलेल्या अन्सारीविरोधात धमकावणे, खंडणी, विनयभंग अशा १९ गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणातील ३२ वर्षीय तक्रारदार महिला घाटकोपर येथील रहिवासी असून व्यवस्थापक म्हणून काम करतात. आरोपीने २४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत तक्रारदार यांच्या मोबाइलवर तसेच त्यांच्या मालकिणीच्या राहत्या घरातील लँडलाइनवर सतत फोन करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार यांना बलात्कार व हत्या करण्याची धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने साकीनाका काजूपाडा परिसरातून आरोपीला 
अटक केली.

 असे हेरायचा महिलांना 
चौकशीदरम्यान, अन्सारी पेडर रोड, बिडी रोड, नेपियन सी रोड, मलबार हिल, जुहू, गावदेवी, बांद्रा परिसरात विविध उच्चभ्रू लोकांच्या घरात लँडलाइनवर दूरध्वनी करून सुतारकाम करायचे असल्याचे सांगून माहिती घेत असे. त्यानंतर तेथे महिला आढळल्यास वारंवार दूरध्वनी करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागत असल्याचे समोर आले. त्याचा मोबाइल ताब्यात घेत पोलीस अधिक  तपास करत आहेत. तो असे का करत होता? त्याने आतापर्यंत किती महिलांना कॉल करून त्रास दिला? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Gajaad, who intimidates elite women, pretends to be a carpenter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.