कोरोनाच्या वाढत्या संसर्गात देखील सुरु होता जुगार; ५ जणांना पोलिसांनी केली अटक तर ४ पसार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 08:46 PM2021-04-29T20:46:40+5:302021-04-29T20:47:14+5:30

Gamgling Case : १ लाख २५ हजारांची रोख व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . 

Gambling also began with the growing corona infection; 5 arrested by police, 4 released | कोरोनाच्या वाढत्या संसर्गात देखील सुरु होता जुगार; ५ जणांना पोलिसांनी केली अटक तर ४ पसार 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात देखील सुरु होता जुगार; ५ जणांना पोलिसांनी केली अटक तर ४ पसार 

Next
ठळक मुद्देसुनील प्रकाश सावंत (४३), अनिष रामलोचन ठाकूर (३६), निलेश मधुकर यादव (४३), भरत नारायण गोहिल (४६) व धर्मेश अमृतभाई टाक (३६) ह्या ५ जुगाऱ्यांना अटक केली.

मीरारोड - कोरोनाचा संसर्ग असल्याने एकीकडे मास्क घाला व गर्दी करू नका असे सांगितले जात असताना मीरारोडच्या हटकेश मध्ये मात्र एका बंद खोलीत जुगार खेळात बसलेल्या ५ जणांना पोलिसांनीअटक केली आहे . १ लाख २५ हजारांची रोख व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . 

हटकेश भागात गौरव रेसिडन्सीच्या बाजूला एका मोकळ्या भूखंडात बांधलेल्या खोलीत जुगार चालत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने मीरारोड पोलिसांना सोबत घेऊन धाड टाकत सुनील प्रकाश सावंत (४३), अनिष रामलोचन ठाकूर (३६), निलेश मधुकर यादव (४३), भरत नारायण गोहिल (४६) व धर्मेश अमृतभाई टाक (३६) ह्या ५ जुगाऱ्यांना अटक केली . तर मालक के. जी. एन इंटरप्रायजेसचा मोहम्मद उस्मान हमीद खान सह अन्य तीन पुरुष व महिला ह्या पळून गेल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.  अजय मांडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Gambling also began with the growing corona infection; 5 arrested by police, 4 released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.