शिर्डीमध्ये ताज हॉटेल सुरू करण्याच्या नावे गंडा; कॅनरा बँकेची ३९ कोटींची फसवणूक'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 02:19 PM2023-05-19T14:19:09+5:302023-05-19T14:20:02+5:30

...त्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या रकमेची अफरातफर केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने कंपनी व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Ganda favors starting Taj Hotel in Shirdi; 39 Crore fraud of Canara Bank' | शिर्डीमध्ये ताज हॉटेल सुरू करण्याच्या नावे गंडा; कॅनरा बँकेची ३९ कोटींची फसवणूक'

शिर्डीमध्ये ताज हॉटेल सुरू करण्याच्या नावे गंडा; कॅनरा बँकेची ३९ कोटींची फसवणूक'

googlenewsNext

मुंबई : शिर्डी येथे ‘द गेट वे हॉटेल’ या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कॅनरा बँकेकडून कर्ज घेत ते बुडवल्याप्रकरणी पुणेस्थित ट्रिलियन रिअल इस्टेट कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हे फोर स्टार हॉटेल बांधून झाल्यानंतर ताज समुहासोबत ते संलग्न होण्याचा प्रस्ताव होता. मात्र, कंपनीने हॉटेलचे बांधकाम अर्धवटच सोडले. त्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या रकमेची अफरातफर केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने कंपनी व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कंपनीने २०१३ ते २०१६ या कालावधीमध्ये कॅनरा बँकेकडून ५५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. एप्रिल २०१६ मध्ये हॉटेलचे काम पूर्ण होऊन ते सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, ते होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात कंपनीने कर्जाची परतफेडही न केल्याने कंपनीचे कर्ज खाते ३१ मार्च २०१६ रोजी थकीत कर्ज खाते म्हणून घोषित झाले. याप्रकरणी कॅनरा बँकेला ३९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.  फोरेन्सिक ऑडिटमध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती पुढे आली.  

कॅनरा बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे कंपनीचे माजी संचालक सोमनाथ साक्रे, संदीप कोयते, आश्रभ गरड व जया गरड यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. कर्ज प्राप्त रकमेचे पैसे फिरवणे, व्यवहारांच्या बनावट नोंदी तयार करणे,  नियम व अटींचा भंग करणे असे आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत.

गैरव्यवहार काय?
- प्रत्यक्ष कामासाठी ज्या 
मालाची आवक - जावक झाली व त्यासाठी जो खर्च झाला, त्यावरील बिले व वाहनांचे क्रमांक यामध्ये मोठी तफावत दिसून आली.
- काही प्रकरणात तर संबंधित वाहन क्रमाकांची वाहनेच अस्तित्त्वात नसल्याचे आढळून आले. 
- रंगकाम, अंतर्गत सजावट व फर्निचरसाठी खर्च केल्याचे कंपनीने दाखवले. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी तांत्रिक पथकासोबत केलेल्या पाहणीच्या दरम्यान बांधकामच अर्धवट असल्याचे आढळून आले. 
- याखेरीज, कंपनीने कर्जापोटी दिलेल्या एकूण ८५ टक्के रकमेचा वापर केल्याचे दिसून आले. मात्र, त्या प्रमाणात काम झाले नसल्याचे या पथकाला आढळून आले.

Web Title: Ganda favors starting Taj Hotel in Shirdi; 39 Crore fraud of Canara Bank'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.