कर्ज न घेता बनले कर्जदार, बनावट कागदपत्रे बनवून हजारो लोकांची केली फसवणूक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:45 AM2022-11-24T11:45:26+5:302022-11-24T11:48:10+5:30

Crime News : दुकानात बसून आरोपींनी गेल्या वर्षभरात हजारो लोकांची फसवणूक केली आहे.

gang defrauded by taking loan in the name of others exposed cm flying caught four fraudsters in gurugram in haryana | कर्ज न घेता बनले कर्जदार, बनावट कागदपत्रे बनवून हजारो लोकांची केली फसवणूक! 

कर्ज न घेता बनले कर्जदार, बनावट कागदपत्रे बनवून हजारो लोकांची केली फसवणूक! 

Next

जर तुम्ही आधार किंवा पॅन कार्डची प्रत कोणत्याही कार्यालयात किंवा मोबाईल शोरूममध्ये जमा केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी थोडी धक्कादायक आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून काही फसवणूक करणारे तुमच्या नावावर कर्ज घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.  तसेच, हे देखील शक्य आहे की फसवणूक करणाऱ्यांनी आधीच कर्ज घेतले आहे आणि सुरुवातीचे हप्ते स्वतः भरत करत आहेत. 

हे वाचून धक्का बसला असेल. मात्र, हे खरे आहे. गुरुग्राममध्ये बऱ्याच दिवसांपासून अशाच घटना घडत होत्या. अशाप्रकारची माहिती सीएम पोर्टलवर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे विशेष पथक सक्रिय झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास केला. यादरम्यान पथकाने गुरुग्रामच्या गांधी नगर गल्ली क्रमांक सहामध्ये छापा टाकून चार फसवणूक करणाऱ्यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या फसवणूक करणार्‍यांच्या चौकशीत असे आढळून आले आहे की, ते कोणत्याही मोबाईल शोरूम किंवा इतर सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयातून लोकांचे आधार आणि पॅन कार्ड मिळवत असत. त्यानंतर या कागदपत्रांच्या माध्यमातून ते आधी बँकेत खाते उघडायचे आणि नंतर या खात्यातील कर्जाची रक्कम मागवून, ती एटीएममधून काढत होते. तसेच, आरोपींनी तपास पथकाला सांगितले की, हे लोक सुरुवातीचे तीन ते चार हप्ते स्वतः जमा करायचे, पण नंतर ईएमआय बाऊन्स झाल्यावर कागदपत्रधारकांना या प्रकरणाची माहिती मिळाली.

कोणासोबतही मोठी फसवणूक केली नसल्याचे आरोपींनी तपास पथकाच्या चौकशीत सांगितले. मात्र प्रत्येक पीडितेच्या नावावर तो किमान तीन लाख आणि कमाल पाच लाख रुपयांचे कर्ज घेत होते. यातील काही रक्कम बँक कर्मचाऱ्याला देण्यात आली होती. कागदपत्रे मॉर्फ करण्यासाठी काही पैसे खर्च झाले. त्याचबरोबर सुरुवातीचे दोन-तीन हप्ते भरण्यासाठी काही रक्कम वापरली जात होती. उर्वरित रक्कम आरोपी आपापसात वाटून घेत होते.

आरोपींकडून साहित्य जप्त
सीएम फ्लाइंग पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या ताब्यातून लॅपटॉप, प्रिंटर, 15 पॅन कार्ड, 24 आधार कार्ड, सर्व हरयाणा ग्रामीण बँकेचे डेबिट कार्ड, सर्व हरयाणा ग्रामीण बँकेचे स्टॅम्प, कर्ज अर्ज, 21 सिम एअरटेल, 3 सिम व्होडाफोन, बँक पासबुक, चेकबुक, आयडी, प्रतिज्ञापत्र, इतर अनेक संवेदनशील कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. गांधी नगर रहिवासी सचिन गुप्ता, त्याचा भाऊ आशु उर्फ ​​अमन आणि दिल्लीचा रहिवासी नितीन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याचे पथकाने सांगितले. आरोपींनी खांडसा भाजी मंडईसमोर भाड्याने दुकानही घेतले आहे. या दुकानात बसून आरोपींनी गेल्या वर्षभरात हजारो लोकांची फसवणूक केली आहे.

Web Title: gang defrauded by taking loan in the name of others exposed cm flying caught four fraudsters in gurugram in haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.