सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 09:18 PM2021-05-31T21:18:15+5:302021-05-31T21:21:59+5:30

Khamgaon Crime News : पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

The gang that looted gold coins by showing the lure of giving them at a lower price | सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमीष दाखवून लुटणाºया दुसºया एका टोळीला खामगाव पोलिसांनी जेरबंद केले. चाकूचा धाक दाखवून लुटणाºया टोळीतील एकाने नकळत दूरध्वनी केल्यानंतर संबंधिताने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दधम, जयरामगड येथील दुसºयाटोळीचे बिंग फुटले. पोलिसांनी सतर्कतेने कोंबीग आॅपरेशन राबवून पाच जणांना अटक केली.
सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून टोळीतील काहींनी फिर्यादी हनुमान महादेव गिरी (२४) रा. माळशेलू जि. हिंगोली आणि त्याचा मित्राला २९ मे रोजी बोलाविले. शीर्ला येथील राधास्वामी संत्सगाजवळ फिर्यादी पोहोचल्यांनतर तेथे आधीच सापळा रचून बसलेल्या १० ते १२ जणांनी फिर्यादी जवळील २५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. त्यानंतर या टोळीतील काहींनी संबंधिताच्या दूरध्वनीवर संपर्क करीत, ३ ते ४ रुपये घेऊन नकली सोन्याच्या नाण्याचे आमिष देत बोलाविले. त्यावेळी फिर्यादीने पोलिसांनी संपर्क केला. त्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात ६४ अधिकाºयांनी दधम, हिवरखेड परिसरात कोंबींग आॅपरेशन राबविले. जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस निरिक्षक संतोष ताले, ठाणेदार प्रविण तळी, गोकुळ सूर्यवंशी, सपोनिी गोंदके, सपोनि गौतम इंगळे, सपोनि निलेश सरदार, पोउपनि गौरव सराग, पोउपनि राहुल कातकाडे, पोउपनि ईश्वर सोळंके, पोउपनि पळसपगार, नितिन इंगाहे, ब्राम्हणे, हरिविजय बोबडे यांनी ही कारवाई केली.

 


पाच आरोपी अटकेत
- महेश बाळू मोहिते (२३), दिलीप शेषराव चव्हाण (२३), कृष्णा पुंडलिक चव्हाण (६०), बळीराम पुंडलिक चव्हाण(४५) सर्व रा. दधम आणि सतिश पवन पवार (१९) रा. जयरामगड यास अटक केली. दरम्यान, २९ मे रोजीच्या घटनेत याप्रकरणी भादंवि कलम ३९५, ३९७ अन्वये हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दुर्जन किसन शिंदे रा. जयरामगड यास अटक करण्यात आली होती.


मोटारसायकलीसह ९० हजारा मुद्देमाल जप्त
- पोलिसांनी सोमवारी राबविलेल्या कोंबींग आॅपरेशनमध्ये एक तलवार, एक सुरा, दोन चाकू, एक लाकडी दांडा, एक मोबाईल तसेच  एम एच २८ बीडी- ८८४५ या क्रमांकाची दुचाकी असा एकुण ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: The gang that looted gold coins by showing the lure of giving them at a lower price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.