हाॅटेल व्यवसायिकाला ऑनलाईन गंडा घालणारी नायेरियन टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:08 PM2021-02-01T21:08:37+5:302021-02-01T21:09:01+5:30
Online Fraud : सायबर पोलिसांची कामगिरी: चौघांना अटक, १४ लाखांची फसवणूक
अहमदनगर: आयुर्वेदिक हर्बल व्यवसायाचे अमिष दाखवून नगर येथील हॉटेल व्यवसायिकास १४ लाख १७हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला येथील सायबर पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केले.स्टॉन्ली स्मित (रा. मुळ नायजेरियन हल्ली रा. पिंपरी चिंचवड, पुणे), निलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा, अलेक्स ओड्डू उर्फ मार्क व अलेन उर्फ मिरॅकल (हल्ली सर्व रा.पिंपरी चिंचवड, पुणे) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. या टोळीने केडगाव येथील ओंकार मधुकर भालेकर यांची फसवणूक केली होती. आरोपींनी प्रथम भालेकर यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल ऑईल खरेदी करावयाचे आहे. या व्यवसायात तुम्ही सहभागी झाले तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील असे अमिष आरोपींनी भालेकर यांना दाखिवले.
त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगाून भालेकर यांच्याकडून विविध बँक खात्यावर पैसे मागावून घेतले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भालेकर यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक प्रतीक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर
कारखेले, मल्लिकार्जुन बनकर यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना पुणे येथून अटक केली. या आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींकडून१मोबाईल, विविध बँकांचे दहा पासबुक, आठ एटीएम कार्ड असा एकूण ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक मधुकर साळवे, उपनिरिक्षक प्रतिक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक दिगंबर कारखेले, विशाल अमृते, राहुल हुसळे, गणेश पाटील, राहुल गुंडू, अमोल गायकवाड, अभिजित अरकल, अरुण सांगळे, वासुदेव शेलार, सविता खताळ, पूजा भांगरे, प्रितम गायकवाड, उर्मिला चेके, दिपाली घोडके, सिमा भांगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या
या टोळीने अनेकांना घातला गंडा
पुणे येथील नायजेरियन टोळीने पैशांचे अमिष दाखून अशाच पद्धतीने अनेकांना ऑनलाईन गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समोवश आहे.