गुन्हेगारांची टोळी २ वर्षांसाठी हद्दपार; पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश

By सचिन राऊत | Published: September 30, 2022 03:15 PM2022-09-30T15:15:01+5:302022-09-30T15:15:14+5:30

सण उत्सवामुळे प्रतिबंधात्मक कारवाई

gang of criminals ban for 2 years for akola district; Superintendent of Police G. Sridhar's order | गुन्हेगारांची टोळी २ वर्षांसाठी हद्दपार; पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश

गुन्हेगारांची टोळी २ वर्षांसाठी हद्दपार; पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश

Next

अकोला : बार्शीटाकळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीसह जिल्हयातील विविध भागात टाेळीने गुन्हे करणाऱ्या राजनखेड येथील रहीवासी असलेल्या तीन जणांच्या टाेळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने शुक्रवारी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे १६० पेक्षा अधिक टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

बार्शीटाकळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत टाेळीने गुन्हे करणारे तसेच राजनखेड येथील रहिवासी झाबु भिका राठोड  (वय ५७ वर्ष), गोविंदा झाबू राठोड (वय ३०वर्ष ) आणि हरिश्चंद्र झाबु राठोड (वय ३१ वर्ष) हे तीघेजण शहरासह जिल्हयात टाेळीने गुन्हे करीत असल्याची माहीती पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांना मीळाली. या माहितीवरून या टाेळीतील गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या टाेळीतील तीन जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून बार्शीटाकळी पोलिसांनी या टाेळीतील तीन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. बार्शीटाकळी पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या गुन्हेगारी टाेळीतील तीन जणांनी टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, तीन्ही गुन्हेगार पाेलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकानी हा आदेश शुक्रवारी दिला असून, टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. ही कारवाइ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनीका राउत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळी पाेलिसांनी केली़.

Web Title: gang of criminals ban for 2 years for akola district; Superintendent of Police G. Sridhar's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.