सामूहिक बलात्कारातील आरोपीला मारहाण; मध्यस्थी मित्राची गोळी घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 04:40 PM2020-03-31T16:40:48+5:302020-03-31T16:42:55+5:30
सोमवारी सरमेरा पोलीस ठाण्यांतर्गत बिहटा-सरमेरा एस.एच.जवळ दुचाकीस्वारांची मारामारी सोडविण्यास गेलेल्या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
सामूहिक बलात्काराच्या आरोपीला रस्त्यावरच दुसऱ्या आरोपीने मारहाण केली आणि वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राला गोळ्या घालून ठार केले. सोमवारी सरमेरा पोलीस ठाण्यांतर्गत बिहटा-सरमेरा एस.एच.जवळ दुचाकीस्वारांची मारामारी सोडविण्यास गेलेल्या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सोमवारी सरमेरा पोलीस ठाण्यांतर्गत बिहटा-सरमेरा एस.एच.जवळ दुचाकीस्वारांनी त्या तरुणाला गोळ्या घालून ठार केले. हा गुन्हा केल्यावर गुन्हेगार फरार झाले. दोघेजण सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला रस्त्यावर मारहाण करीत होते. आरोपीच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तो यात मृत्युमुखी पावला. कुंदन चौधरी असं मृत तरुणाचे नाव असून सरमेरा गावचे रहिवासी असेलेल्या अशोक चौधरी यांचा २२ वर्षांचा कुंदन हा मुलगा आहे. या गोळीबारात बलात्काराचा आरोपी विकास कुमार जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खळबळ उडाली आहे. स्टेशन प्रमुख पोलीस पथकासह घटनास्थळी आले. पोलिसांनी मृत आणि जखमीस सदर रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयाने गोळीबारात जखमी झालेल्या कुंदनला मृत घोषित केले. सामूहिक बलात्काराच्या वादात ही घटना घडल्याची चर्चा आहे. तसा पोलिसांना देखील संशय आहे. मात्र, मृत तरुणाचा सामूहिक बलात्काराशी काही संबंध नव्हता. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिला. या युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर डीएसपी इम्रान परवेझ यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कुंदनला घरातून खांडा येथे जाण्यास सांगितले निघाला होता. विकास सुद्धा त्याच्यासमवेत खंदाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी काही नराधमांनी विकासला घेरले आणि मारहाण करण्यास सुरवात केली.
कुंदन विकासला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याचवेळी, गुंडांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुंदन जखमी झाला. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. पोलिसांनी दोन्ही जखमींना सदर रुग्णालयात उपचारासाठी नेले. जेथे डॉक्टरांनी कुंदनला मृत घोषित केले. १७ जून २०१८ रोजी सरमेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरात चार नराधमांनी एका पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी विकास, अरविंद चौधरी, डहन आणि बबलू यांना अटक केली.