धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त तरुणीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:11 PM2019-08-01T18:11:43+5:302019-08-01T18:13:05+5:30

रुग्णालयात उपचारादरम्यान करण्यात आलेल्या चौकशीवेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघड

Gang rape with HIV infected girl; Four accused arrested from Mumbai | धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त तरुणीवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! एचआयव्हीग्रस्त तरुणीवर सामूहिक बलात्कार

Next
ठळक मुद्दे पीडित तरुणी घरी गेली असता चक्कर येऊन खाली कोसळली. १४ जुलै रोजी वडिलांना तरुणीच्या भावाला कॉल केला. त्यांना बहिणीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले.

मुंबई - मुंबईत रात्रीच्या वेळी एका १९ वर्षीय एचआयव्हीग्रस्त तरुणीवर सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. मूळची जालनाची असलेली ही तरुणी मुंबईत भावाबरोबर राहते. तिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान करण्यात आलेल्या चौकशीवेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

आपल्या मैत्रीणीच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून ती रात्रीच्या वेळी घरी निघाली असताना अचानक चारजणांची गॅंग तिथे आले व त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व तिथून पळ काढला. त्यानंतर पीडिता घरी गेली असता चक्कर येऊन खाली कोसळली. पीडितेची तब्येत अचानक बिघडल्याने भावाने तिला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, १४ जुलै रोजी वडिलांना तरुणीच्या भावाला कॉल केला. त्यावेळी त्यांना बहिणीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. डॉक्टरांनी उपचारादरम्यान सामूहिक बलात्काराबाबत सांगितले असता वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात (झिरो एफआयआर) गुन्हा दाखल केला. गुन्हा मुंबईत घडलेला असल्याने बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यात हस्तांतरणाबाबत कालच कागदपत्र दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पोलीस उपायुक्त (जनसंपर्क अधिकारी) प्रणय अशोक यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा हस्तांतरित केलेला नसून कागदपत्र मिळाली की अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्यात येईल. 

Web Title: Gang rape with HIV infected girl; Four accused arrested from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.