माजी सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप अन् मोबाईलवर रेकॉर्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:22 AM2023-12-12T09:22:35+5:302023-12-12T09:22:56+5:30
या घटनेतील पीडित मुलीच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता त्यासाठी ती उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेली होती.
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये माजी सरकारी अधिकाऱ्याच्या २३ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात २ चहावाले आणि एक रुग्णवाहिका चालक आहे. किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटीच्या गेटजवळ ५ डिसेंबरला ही घटना घडली. त्यानंतर ६ दिवसांनी मुलीचे नातेवाईक पोलिसांकडे जात तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत १२ तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या.
या घटनेतील पीडित मुलीच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता त्यासाठी ती उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी २ चहावाले आणि १ रुग्णवाहिका चालकाने तिला जाळ्यात ओढले. आरोपी मुलीला कारमध्ये बसवून शहरात फिरत होते. हसनगंजच्या आयटी क्रॉसिंग बाराबंकी सफेदाबाद इथं मुलीवर गँगरेप करण्यात आला. त्याआधी मुलीला गुंगीचे औषध बळजबरीने पाजण्यात आले. या घटनेची तक्रार पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार रविवारी पोलिसांनी आरोपी सत्यम मिश्रा, मोहम्मद सुहैल आणि मोहम्मद आलम यांच्याविरोधात आयपीसी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. रात्री १२.४५ च्या सुमाराम हे आरोपी इंटर कॉलेजच्या बाहेर फिरत होते. मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने घटनेनंतर लगेच तक्रार दाखल केली नाही.या घटनेबाबत डीसीपी राहुल यांनी म्हटलं की, केजीएमयूमध्ये पीडितेवर उपचार सुरू होते. त्यावेळी गेटजवळ असलेल्या चहावाल्याकडे ती चहा पिण्यासाठी जात होती. ती चहावाला सत्यमला ओळखत होती. ५ डिसेंबरला ती चहा पिण्यासाठी गेली असता तिने फोन चार्ज करण्याबाबत सत्यमला विचारले. त्यावेळी मुलीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेत सत्यमने शेजारी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत मोबाईल चार्ज करण्यास सांगितले. ती मोबाईल पूर्ण चार्ज होण्याची वाट पाहत होती.
त्यातच रुग्णवाहिका एका रुग्णाला आणण्यासाठी गाडी घेऊन निघून गेला. खूप वेळ झाला तरी तो आला नाही तेव्हा मुलीने सत्यमला फोनबाबत विचारले. तेव्हा रुग्णवाहिका डालीगंज परिसरात होती. ई रिक्षातून सत्यम आणि मुलगी त्याठिकाणे पोहचले आणि मुलीला तिचा फोन मिळाला.मात्र त्यानंतर सत्यम आणि दोघांनी तिला बळजबरीनं गाडीत बसवले आणि गुंगीचे औषध दिले. जर आमचे ऐकले नाही तर तुला गाडीतून बाहेर फेकू अशी धमकी सत्यमने पीडितेला दिली. त्यानंतर तिघांनी पीडितेवर गँगरेप केला. हे सगळे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. जर हे कुणाला सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी मुलीला देत तिला उतरवले आणि तिथून पसार झाले.