अकोल्यातील न्यू तापडिया नगरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:03 AM2022-12-17T10:03:38+5:302022-12-17T10:07:07+5:30
गत काही महिन्यांपासून अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. अकोला शहरात सातत्याने प्राण घातक हल्ले, चोरी, घरफोडी, हत्या, लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत.
अकोला: अकोल्यातील न्यू तापडिया नगरात शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास 14 वर्षीय व सोळा वर्षीय दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी मिळून गॅंग रेप केला. या प्रकरणात संशयित आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी दहा वाजता पासून सुरू होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गत काही महिन्यांपासून अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. अकोला शहरात सातत्याने प्राण घातक हल्ले, चोरी, घरफोडी, हत्या, लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. यावरून पोलिसांचे गुन्हेगारी वरील नियंत्रण सुटत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील न्यू तापडिया नगर भागात शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी मिळून गॅंग रेप केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मुलींचे पालक सिविल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले असून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.