अंबरनाथमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:42 PM2022-01-03T13:42:20+5:302022-01-03T13:42:41+5:30
Crime News : या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात काम करते. ति
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे फिरवत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथच्या जीआयपी डॅम परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची घटना घडली.
या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात काम करते. तिचा मित्र हनुमान हिलम हा रविवारी त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्यासोबत जीआयपी डॅम परिसरात दारू पिण्यासाठी बसला होता. याचदरम्यान हनुमान याने पीडित तरुणीला फोन करून जीआयपी डॅम परिसरात बोलावून घेतले. तिला आणण्यासाठी हनुमान याने मित्राची रिक्षा देखील पाठवली. तिला समोर बसवून तिघा मित्रांनी दारू पीत तिला घाबरवण्यास सुरुवात केली.
एवढेच नव्हे तर बिअरची बाटली फोडून, त्या बाटलीने तिला भोसकण्याची धमकी देत तिचा शारीरिक छळ केला. यानंतर हनुमान याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर त्याचे मित्र विश्वास आणि जावेद यांनीही तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर हादरलेल्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार केली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या तिघांना तातडीने शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित मुलीवर तिच्या जवळ तिच्या मित्रांनी बलात्कार केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. - मधुकर भोगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक