ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनीच केला तरूणीवर सामूहिक बलात्कार; भावाची मदतीसाठी विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:25 PM2021-06-03T20:25:11+5:302021-06-03T20:28:09+5:30

Gangrape Case : ऑपरेशन दरम्यान, मुलीने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर चुकीचे काम केल्याचा आरोप केला आहे.

Gang rape of a young girl by a doctor during operation; A plea for brother's help | ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनीच केला तरूणीवर सामूहिक बलात्कार; भावाची मदतीसाठी विनवणी

ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनीच केला तरूणीवर सामूहिक बलात्कार; भावाची मदतीसाठी विनवणी

googlenewsNext
ठळक मुद्देत्याचवेळी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तहान लागली होती. डॉक्टरांनी पाणी देण्यास नकार दिला होता. म्हणूनच ती अस्वस्थ होती. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी मोठे ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला.

डॉक्टरांना आपण देवासारखे मानतो, परंतु उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील  स्वरूपरानी नेहरू  रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीसोबत घडलेल्या घटनेनंतर डॉक्टरांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर, रूग्णालयात भरती झालेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ऑपरेशन दरम्यान, मुलीने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर चुकीचे काम केल्याचा आरोप केला आहे.

त्याचबरोबर सीएमओ आणि मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. मंगळवारी शहरातील रहिवासी असलेल्या एका तरूणाने रात्री उशिरा सोशल मीडियावर ही गोष्ट सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. आपल्या काकाच्या मुलीच्या आतड्याला समस्या आल्यामुळे मुलीला 29 मे रोजी  स्वरूपरानी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुलाने सोशल मीडियावर सांगितले. 1 जून रोजी रात्री 11 वाजता डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी ओटीकडे नेले. दुपारी 1 वाजता जेव्हा ती ऑपरेशन थिएटरमधून परत आली तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. थोड्या वेळाने, जेव्हा तिला पुन्हा शुद्ध आली तेव्हा तिने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ती काही सांगू शकली नाही. त्यानंतर तिला एक पेन देण्यात आला, त्यानंतर तिने कागदावर लिहिले आणि सांगितले की, काही लोकांनी तिच्याबरोबर चुकीचे कृत्य केले आहे.

यानंतर त्यांनी प्रयागराजच्या एसएसपीला फोन करून याबाबत माहिती दिली. थोड्या वेळाने पोलिस दवाखान्यात आले आणि पोलिसांनी चौकशी केली आणि दरम्यान पोलिसांनी पीडित मुलीने लिहिलेली चिठ्ठी फाडली असा आरोप केला जात आहे.



घरातील सदस्यांनी कोणताही आरोप केला नाही
या प्रकरणात डीआयजी  सर्वश्रेष्ठ त्रिपाठी  यांनी सांगितले की, रात्री तक्रार मिळाल्यानंतर सीओ कोतवाली सतेंद्र तिवारी घटनास्थळी गेले होते. पोलिसांनी पीडितेच्या आई आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी असा आरोप कोणीही केलेला नाही. मात्र, अद्याप या मुलीची चौकशी होणे बाकी आहे. मुलगी पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर तिच्याकडून या प्रकरणात देखील चौकशी केली जाईल. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांनी एक टीम स्थापन केली आहे.

त्याचवेळी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तहान लागली होती. डॉक्टरांनी पाणी देण्यास नकार दिला होता. म्हणूनच ती अस्वस्थ होती. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी मोठे ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला.

दुष्कर्म झाले आहे माझ्यासोबत 
या सामूहिक बलात्काराचा आरोप करणाऱ्या भावाने आपल्या बहिणीचा व्हिडिओ आणि हाताने लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरलही केली आहे. त्याच्या बहिणीने लिहिलेली चिठ्ठी,  खोटे बोलले. उपचार काहीच केले नाही. माझ्यासोबत चुकीचे काम केले आहे.

सीएमओने समिती गठीत केली
मुलीच्या आरोपानंतर आरोग्य विभागाने चौकशी समिती गठीत केली आहे. सीएमओ डॉ. प्रभाकर राय यांनी ही समिती गठीत केली आहे. समितीला चौकशी अहवाल लवकरच सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

Web Title: Gang rape of a young girl by a doctor during operation; A plea for brother's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.