बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 07:02 IST2021-05-16T07:02:38+5:302021-05-16T07:02:59+5:30
बँडस्टँड येथील खडकात मित्रांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक
मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी फिरायला बंदी असल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. याचाच फायदा घेऊन वांद्रे येथील बँडस्टँड भागात ३ मित्रांनी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.
गोवंडीत राहणारी १९ वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री तीन मित्रांसह दुचाकीवरून बँडस्टँड येथे आली. येथीलच खडकाआड मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. याबाबत वाच्यता केल्यास बदनामीची भीती घातली. काहीच दिवसांनी तरुणीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस गाठून तक्रार दिली. त्यानुसार पाेलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी १८ ते २१ वयोगटातील आहे. बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
‘त्या’ महिलेच्या हत्येमागचे गूढ कायम
बीकेसीत गेल्या आठवड्यात एका महिलेचा मृतदेह आढळला हाेता. प्राथमिक तपासात बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. या हत्येचे गूढ कायम असून पाेलीस अधिक तपास करत आहेत.