टोळी पुन्हा सक्रीय :महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह मोबाइलही खेचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:21 PM2021-01-13T14:21:15+5:302021-01-13T14:25:24+5:30

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉलेजरोड, गंगापुररोड, आनंदवली, अंबड लिंकरोड आदि भागात नाकाबंदीच्या सुचना देत गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क केले; मात्र फरार चोरटे पोलिसांच्या हाती लागू शकले नाही.

Gang reactivated: Pulls mobile phone along with gold chain around woman's neck | टोळी पुन्हा सक्रीय :महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह मोबाइलही खेचला

टोळी पुन्हा सक्रीय :महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीसह मोबाइलही खेचला

Next
ठळक मुद्देसलग तीन दिवसांपासून घटनाजबरी लुटीत ८५ हजारांची सोनसाखळी हिसकावून पोबारा

नाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी चोरांची टोळी पुन्हा सक्रीय झाली आहे. मागील तीन दिवसांपासून सलग शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडू लागल्याने संताप व्यक्त होत आहे. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेजरोड येथील शिर्के मळ्यात एका महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची सोनसाखळी व हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी जोत्सना गोविंद जंगले (६०,रा.प्रभुप्रसाद अपार्टमेंट, शिर्केमळा) या त्यांच्या राहत्या घराजवळ चारचाकी वाहन उभे करण्यासाठी गेले असता अपार्टमेंटपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असताना भरधाव दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि.११) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी या जबरी लुटीत ८५ हजारांची सोनसाखळी व ५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल असा एकूण ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे जंगले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉलेजरोड, गंगापुररोड, आनंदवली, अंबड लिंकरोड आदि भागात नाकाबंदीच्या सुचना देत गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क केले; मात्र फरार चोरटे पोलिसांच्या हाती लागू शकले नाही.


नववर्षात पुन्हा पोलिसांपुढे आव्हान

सोनसाखळी चोरी करणारी टोळी नववर्षात पुन्हा शहरात सक्रीय होऊ लागली असून शहर पोलिसांपुढे या टोळीला बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचारी महिलांना लक्ष्य केले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आडगाव, मुंबईनाका आणि आता गंगापूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ते पाच दिवसांत लागोपाठ घटना घडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Gang reactivated: Pulls mobile phone along with gold chain around woman's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.