'तू दादा की, मी दादा' म्हणत गॅंगवार; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 07:44 PM2020-09-14T19:44:51+5:302020-09-14T19:45:10+5:30

संशयितांना कोठडी; आणखी दोघांना अटक

Gang war against 12 people for saying 'you are dada or I am ' | 'तू दादा की, मी दादा' म्हणत गॅंगवार; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

'तू दादा की, मी दादा' म्हणत गॅंगवार; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देएमआयडीसी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल व शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : 'तू दादा कि मी दादा' म्हणत दादागिरीच्या वर्चस्वातून दोन गटात उफाळलेल्या गॅंगवार प्रकरणात १२ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल व शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशू सुरेश मोरे (१९, एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी), दीपक लक्ष्मण तरटे (२४, नागसेननगर), किरण शिवाजी गव्हाने (२४, प्रविणपार्क, रामेश्वर कॉलनी), विशाल भगवान पाटील (२१, मंगलपूरी, रामेश्वर कॉलनी), छोटा किरण उर्फ किरण शामराव चितळे (२२, सुप्रिम कॉलनी), आकाश दिलीप परदेशी व राकेश कैलास पाटील या सात जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


  कुसुंबा टोल नाक्याजवळ रविवारी दुपारी किरण खर्चे व विशाल अहिरे यांच्या गटात झालेल्या गँगवॉर झाले होते.  दोन्ही गटातील सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.  या घटनेत विशाल राजू अहिरे (२८, रा. रामेश्वर कॉलनी), किरण खर्चे (रा.२७, नितीन साहित्यानगर) व किरण गव्हाणे व आणखी एक असे हे चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अटकेतील संशयितांना न्या.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारतर्फे सरकारी वकील किशोर तडवी यांनी काम पाहिले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

 

Web Title: Gang war against 12 people for saying 'you are dada or I am '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.