हॉटेलच्या रूममध्ये विवाहित महिलेवर गॅंगरेप, व्हिडिओ बनवून पाठवला मित्रांना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 06:44 PM2022-01-29T18:44:13+5:302022-01-29T21:17:07+5:30
Gangrape Case : या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
आता राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका विवाहितेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
पीडित महिला सातत्याने एसपी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे, मात्र अद्यापपर्यंत फरार आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. अलवरमधील एका गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या घरी दूध घेण्यासाठी आलेल्या तरुणाने तिला फूस लावून आपल्यासोबत नेल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे हॉटेलमधील कोल्डिंगमध्ये नशेचे औषध देऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले आणि पीडितेचा अश्लील व्हिडिओही बनवला.
प्रेमाच्या जाळ्यात व्यावसायिकाला अडकवून, पैशाच्या बहाण्याने घरी बोलावले अन् महिलेने काढले स्वतःचे कपडे काढले मग...
मित्रांना व्हिडिओ पाठवला
आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडिओ त्याच्या मित्रांना पाठवला आणि बघता बघता हा व्हिडिओ ५ लोकांपर्यंत पोहोचला. व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करून पाच गुन्हेगारांनी महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणली. पीडितेचे म्हणणे आहे की, ६ महिने नराधमांनी जनावरांप्रमाणे तिच्यासोबत गैरकृत्य केले आणि ती हा सगळा त्रास सहन करत राहिली. अत्यंत त्रासलेल्या पीडितेने ही बाब पोलिसांत नोंदवली. एफआयआर लिहिल्यानंतर पोलिसांना आतापर्यंत फक्त एका आरोपीला पकडता आले असून इतर फरार आहेत.
६ महिने केला बलात्कार
पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती जुलै २०२१ मध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी मालाखेडा येथे आली होती. कुठे वाटेत त्याला एक तरुण भेटला जो त्याच्या घरी रोज दूध आणायला यायचा. त्यानंतर तरुणाने तिला आमिष दाखवून आपल्यासोबत अलवर येथे आणले. हॉटेलच्या एका खोलीत कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून त्याने महिलेला बेशुद्ध केले आणि तिच्या मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांनी एका आरोपीला अटक केली
याप्रकरणी एसपी तेजस्वी गौतम यांनी सांगितले की, महिलेने गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. सध्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेतील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल.