ट्युशनहून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीवर गँगरेप; पीडितेने विष प्राशन करून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 02:23 PM2021-04-02T14:23:33+5:302021-04-02T14:29:33+5:30
Gangrap victim committed suicide : एसपी देहात केशव कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत चार तरुणांचा सहभाग होता.
मेरठ: उत्तर प्रदेशमधील सरधना कोतवाली परिसरातील पोलिस ठाण्यात एका खेड्यात ट्युशनहून घरी परत येत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर खेड्यातीलच चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. दुखापत झालेल्या मुलीने घरी पोहोचल्यानंतर विषारी पदार्थ सेवन केले असून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली. एसपी देहात केशव कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत चार तरुणांचा सहभाग होता.
पुढे ते म्हणाले की, विद्यार्थिनीची सुसाईड नोट घरातून जप्त करण्यात आली असून विद्यार्थिनीने लखन आणि विकास उर्फ मुरली यांचा उल्लेख केला आहे. कुमार म्हणाले की, त्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून अन्य दोन आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे सरधना पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या कुटूंबियांच्या तक्रारीच्या आधारे पीडित अल्पवयीन दहावीत शिकत होती असून गुरुवारी ती घरून शिकवणी शिकण्यासाठी गेली होती. शिकवणीतून परत येत असताना मुलीला कपसड गावात राहणाऱ्या चार तरुणांनी पळवून नेले आणि टॉवरजवळील घरात सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, मुलगी कसा तरी बचाव करून तिच्या घरी पोचली आणि घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. नंतर, जखमी विद्यार्थीनीने घरात विषारी पदार्थ खाल्ल्याने तिची प्रकृती अधिकच खराब झाली आणि सायंकाळी सहाच्या सुमारास तिला मोडिपुरमच्या एसडीएस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चौकशी सुरू असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.