गँगरेप करून बनवलेले व्हिडीओ विकला ३०० रुपयांना; पाच अल्पवयीन मुलांनी केले दुष्कर्म
By पूनम अपराज | Published: February 2, 2021 05:23 PM2021-02-02T17:23:16+5:302021-02-02T17:25:28+5:30
Gangrape : आरोपींनी धक्कादायक गुन्हा करून चित्रित केला आणि ऑनलाईन पोस्ट केला, जो पटकन व्हायरल झाला. तसेच तो व्हिडीओ ३०० रुपयांना विकला आहे.
महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असताना आणखी एका गंभीर गुन्ह्याने उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे. पाच अल्पवयीन मुले आणि एका प्रौढ व्यक्तीने एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी धक्कादायक गुन्हा करून चित्रित केला आणि ऑनलाईन पोस्ट केला, जो पटकन व्हायरल झाला. तसेच तो व्हिडीओ ३०० रुपयांना विकला आहे.
या गुन्ह्यासंदर्भात सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पीडित पोलिसांकडे गेल्यानंतर गुरुवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींपैकी पाच जण १५ ते १७ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुले आहेत. ते विधिसंघर्ष बालक आहेत. पाचही विधीसंघर्ष बालकांना बालगृहात पाठविण्यात आले आहे. सहावा आरोपी जो वयस्क आहे आणि त्याला तुरूंगात पाठविण्यात आले आहे.
"ही महिला आणि पाच मुले शेजारी राहणारे असून एकमेकांना ओळखतात. ऑक्टोबरमध्ये त्यांनी तिला एका शेतात नेले होते, जेथे मोबाईल फोनवर संपूर्ण घटना रेकॉर्ड करून त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. त्यांनी तिला ही घटना कोणालाही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने तिला शांत राहण्यास भाग पाडले. बुधवारी, १९ वर्षांच्या एका आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या महिलेस त्याविषयी माहिती मिळाली. बडगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सिद्धार्थ वर्मा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री एफआयआर दाखल केला आणि त्या तिघांनाही अटक केली.
माणुसकीला काळीमा! 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी केला बलात्कार
टीव्हीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आरोपी परिसरातील लोकांमध्ये व्हिडिओ क्लिप्स प्रत्येकी 300 रुपयात विकत होते. या पाच विधी संघर्ष बालकांविरोधात कलम 376 डी (सामूहिक बलात्कार), ५०६ धमकी) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार (एससी / एसटी अॅक्ट) कलम नोंदविण्यात आले आहे. प्रौढ आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.