धमकी देऊन ब्लॅकमेल करून युवतीवर सामूहिक बलात्कार , 7 आरोपींना अटक तर 3 जण फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 08:17 PM2022-01-30T20:17:54+5:302022-01-30T20:20:45+5:30

Gangrape Case : तपास अधिकारी म्हणून महिला डीवायएसपींची नियुक्ती, आरोपींना वाचण्यासाठी स्वयंघोषित नेत्यांची धडपड

Gangraped on 17 years old girl by threatening, 7 accused arrested, 3 absconded | धमकी देऊन ब्लॅकमेल करून युवतीवर सामूहिक बलात्कार , 7 आरोपींना अटक तर 3 जण फरार

धमकी देऊन ब्लॅकमेल करून युवतीवर सामूहिक बलात्कार , 7 आरोपींना अटक तर 3 जण फरार

Next

नरेश पवार

वडखळ - पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील एका 17 वर्षीय युवतीला धमकी देऊन ब्लॅकमेल करून काही युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने पेण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सात आरोपीना पोलिसांनीअटक केली आहे तर तीन आरोपीचा शोध सुरू आहे. या बाबत वडखळ पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत रजिस्टर नंबर 15/2022, 376 (ड) पोस्को कलम 376 ,4,8,7,12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
    

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरात राहणारी दहावीपर्यंत शिकलेली 17 वर्षीय युवती शेजारीच असलेल्या वाशी गावाच्या परिसरात एका हळदीसमारंभासाठी गेली होती सदर ठिकाणी या युवतीची ओळख दोन तरुणांसोबत झाली होती. या ओळखीचे रुपांतर काहीच दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारिरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर अत्याचार केला. सदर नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करीत होते. मागील अनेक महिन्यांपासून नराधमांनी तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात सुमारे पंधरा हून अधिक जण सहभागी असल्याची चर्चा सुरू आहे. 

असे आले प्रकरण उघडकीस

 सदर  पीडित युवतीला हे नराधम लैंगिक शोषणा करिता वारंवार फोन करीत होते. आपल्या मुलीला वारंवार फोन येत असल्याने पीडित युवतीच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर पीडित युवतीने  हे धक्कादायक वास्तव उघड केले.

 
तपास अधिकारी म्हणून महिला डीवायएसपींची नियुक्ती 

या  प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने तपास होण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोनाली कदम या उपविभागीय पोलिस अधिकारी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. फरार आरोपींच्या शोधाकरिता पोलिसांनी एक पथक तयार केले आहे.
 

Web Title: Gangraped on 17 years old girl by threatening, 7 accused arrested, 3 absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.