चोरीचे सोने विकणारी टोळी खामगावात; दोघे पोलीसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:46 PM2020-01-15T22:46:53+5:302020-01-15T22:46:59+5:30

अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाचे पीएसआय गीते यांनी ही कारवाई केली.

Gangs selling stolen gold in Khamgaon; Both were in police custody | चोरीचे सोने विकणारी टोळी खामगावात; दोघे पोलीसांच्या ताब्यात

चोरीचे सोने विकणारी टोळी खामगावात; दोघे पोलीसांच्या ताब्यात

Next

खामगाव: अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी गेलेल्या सोन्याची विक्री केल्याप्रकरणी अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने खामगावातील दोघांना बुधवारी ताब्यात घेतले. यातील एका आरोपीने चोरीचे सोने सराफाला विकल्याची कबूली दिली. 
अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत मे महिन्यात चोरीची घटना घडली होती. यामध्ये १५७ ग्रॅम सोने चांदीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी अमरावती पोलीसांनी किशोर वायाळ वय ४० रा. मेरा बु. जि. बुलडाणा या चोरट्यास अटक केली.

पोलीस कोठडी दरम्यान त्याने दिलेल्या बयाणावरून बुधवारी अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस पथक खामगावात धडकले. किशोर वायाळ याने दिलेल्या कबुलीनुसार अजय खत्री रा. खामगाव आणि अविनाश मिटकरी रा. खामगाव या दोघांना ताब्यात घेतले. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाचे पीएसआय गीते यांनी ही कारवाई केली. दरम्यान अजय खत्री याने अमरावती येथील चोरीचे सोने खामगावातील सोनल ज्वेलर्स यांना विकल्याचे कबुली दिली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सराफा व्यावासायीकांचीही झाडाझडती घेतली. 

मित्राच्या मदतीने विकले सोने

मेरा बु. येथील चोरटा किशोर वायाळ योने चोरी केलेले सोने विकायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर अविनाश मिटकरीच्या सांगण्यावरून अजय खत्रीने खामगावातील सराफा व्यावसायीकास १०० गॅम सोने मे महिन्यात विकल्याचे समोर आले. या घटनेमुळे अमरावतीचे चोरीचे सोने विकणारी टोळी खामगावात सक्रीय असल्याचे दिसून येते. 

सराफा व्यावसायीक पोलीसांच्या रडारवर

त्यामुळे सोनल ज्वेलर्सच्या संचालकाला पोलीस स्टेशनला बोलावून झाडाझडती घेतली. खामगाव शहरातील सराफा व्यावसायीक या घटनेमुळे पोलिसांच्या रडारवर सापडले आहेत.

Web Title: Gangs selling stolen gold in Khamgaon; Both were in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.