8 खूनांसह 24 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग, तिहार तुरुंगात गँगस्टरचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:01 PM2021-08-04T13:01:47+5:302021-08-04T13:07:34+5:30

Tihar Jail News: दिल्‍लीतील तिहार तुरुंगात अंकित गुर्जरच्या मृत्यूमागे पोलिसांचा हात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

Gangster Ankit Gurjar, who was involved in more than 24 serious crimes, died suspiciously in Tihar jail delhi | 8 खूनांसह 24 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग, तिहार तुरुंगात गँगस्टरचा संशयास्पद मृत्यू

8 खूनांसह 24 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग, तिहार तुरुंगात गँगस्टरचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्दे अंकित गुर्जरवर पोलिसांनी सव्वा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते

नवी दिल्‍ली: आठपेक्षा जास्त हत्येच्या घटनांमध्ये सामील असलेला आणि सध्या राजधानी दिल्‍लीतील तिहार तुरुंगात कैद असलेल्या कुख्यात गँगस्टर अंकित गुर्जरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकितचा तुरुंगातील बॅरक नंबर तीनमध्ये मृत्यू झाला. परंतु, अंकितच्या कुटुंबियांनी पोलिसांवर हत्येचा आरोप लावलाय. परंतु, कैद्यांमध्ये झालेल्या भांडणात अंकितचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणण आहे. 

अंकितच्या कुटुंबियांचं म्हणण आहे की, मंगळवारी पोलिस अधिकारी मीणा यांना अंकितकडे मोबाइल आढळला होता. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली, यावेळी इतर पोलिसांनी अंकितला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सध्या अंकितच्या मृतदेहाला पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले असून,  पोस्ट मॉर्टमची रिपोर्ट आल्यानंतर हत्येचं नेमंक कारण समजू शकेल.

अंकित गुर्जरवर होते सव्वा लाखाचे बक्षीस
दिल्‍ली पोलिसांच्या स्‍पेशल सेलने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल कुन मागच्या वर्षी अंकितला पकडलं होतं. त्याच्यावर 8 पेक्षा जास्त हत्या, वसुली, हत्येचा प्रयत्न, अपहरणा आणि इतर 24 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. दिल्ली आणि पश्चिम यूपीमध्ये अंकित गुर्जर आणि त्याची गँग सक्रिय होती. पोलिसांनी अंकितवर सव्वा लाख रुपयांचे बक्षीसह ठेवले होते. 

Web Title: Gangster Ankit Gurjar, who was involved in more than 24 serious crimes, died suspiciously in Tihar jail delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.