पत्नीला धडा शिकवण्यासाठी कोर्टातून फरार झाला होता गॅंगस्टर, खुलाशाने पोलिसही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 09:47 AM2023-01-17T09:47:33+5:302023-01-17T09:47:54+5:30

Crime News : डीसीपी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितलं की, लखीमपूरमधील विवेक मौर्य उर्फ विपिनला सोमवारी अटक करण्यात आली.

Gangster escaped from the police station to teach a lesson to his cheating wife in Lucknow | पत्नीला धडा शिकवण्यासाठी कोर्टातून फरार झाला होता गॅंगस्टर, खुलाशाने पोलिसही झाले हैराण

पत्नीला धडा शिकवण्यासाठी कोर्टातून फरार झाला होता गॅंगस्टर, खुलाशाने पोलिसही झाले हैराण

Next

Crime News : राजधानी लखनौमध्ये एक गॅंगस्टर आधी कोर्टातून आणि नंतर पोलीस स्टेशनमधून पोलिसांना फसवत फरार झाला. त्याला पुन्हा पकडलं तेव्हा त्याने फरार होण्यामागचं कारण सांगितलं तर सगळेच हैराण झाले. त्याने सांगितलं की, दगाबाज पत्नीला धडा शिकवण्यासाठी तो फरार झाला होता. तो तुरूंगात गेल्यावर त्याची पत्नी एका दुसऱ्या पुरूषांसोबत राहत होती. पोलिसांनी या गुन्हेगारावर 25 हजार रूपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.

डीसीपी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितलं की, लखीमपूरमधील विवेक मौर्य उर्फ विपिनला सोमवारी अटक करण्यात आली. विवेकला 4 नोव्हेंबर 2022 ला कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आलं होतं. सुनावणी दरम्यान पोलिसांना फसवून तो फरार झाला होता.

ज्यानंतर 17 डिसेंबरला त्याला पुन्हा अटक करण्यात आली. विवेकला 18 डिसेंबरला कोर्टात हजर करायचं होतं. त्याआधीच पोलिसांना चकमा देऊन तो पोलीस स्टेशनमधून फरार झाला. फरार झाल्यावर तो दिल्ली, हरयाणानंतर उत्तराखंडला गेला होता. खबऱ्याच्या माहितीनंतर विपिनला सोमवारी पुन्हा अटक केली गेली.

डीसीपीनुसार, चौकशी दरम्यान विवेकने सांगितलं की, मी जेव्हापासून तुरूंगात आहे, तेव्हापासूनच त्याची पत्नी बिहारच्या एका तरूणासोबत राहत होती. यावरून पत्नीला धडा शिकवण्यासाठी त्याने फरार होण्याचा प्लान केला होता. तुरूंगातून पळून जाण्यात अडचण होते. त्यामुळे कोर्ट आणि पोलीस स्टेशनमधून तो पळाला. 

Web Title: Gangster escaped from the police station to teach a lesson to his cheating wife in Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.