कोर्टाच्या आवारात गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या, दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काउंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:17 PM2021-09-24T14:17:00+5:302021-09-24T14:38:08+5:30
Delhi: गँगस्टर जितेंद्र गोगीची दोघांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये कोर्टाच्या आवारातच एका सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील रोहिणी कोर्ट परिसरात गँगस्टर जितेंद्र गोगी याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तारखेला आलेल्या गोगीवर वकीलाच्या वेशाल आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या.
Assam: अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान हिंसक चकमक; 2 आंदोलक ठार, 9 पोलीस जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र गोगी रोहिणी कोर्टात आपल्या कोर्टाच्या तारखेसाठी आला होता. यादरम्यान वकीलाच्या वेशाल आलेल्यो दोघांन त्याच्या गोळ्या झाडल्या. यात गोगीचा जागीच मृत्यू झाला तर घटनेत परिसरातील इतर काही लोकंही जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळ्या झाडणारे टिल्लू गँगचे शूटर होते.
रोहिणी कोर्टातील गोळीबाराचा व्हिडिओ-
#WATCH | Visuals of the shootout at Delhi's Rohini court today
— ANI (@ANI) September 24, 2021
As per Delhi Police, assailants opened fire at gangster Jitender Mann 'Gogi', who has died. Three attackers have also been shot dead by police. pic.twitter.com/dYgRjQGW7J
एन्काउंटरमध्ये आरोपी ठार
पोलिसांनी सांगितल्यानुसार, टिल्लू गँगचे शूटर जितेंद्र गोगीला मारण्यासाठी वकीलाच्या वेशात आले होते. जितेंद्र गोगीला मारल्यानंत पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जागीच ठार केलं. अद्याप या दोघांची ओळख पटलेली नाही. दोन गँगच्या जुन्या वादामुळे ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, शस्त्र आणि स्फोटकांसह 3 दहशतवादी अटक
कोण होता जितेंद्र गोगी ?
जितेंद्र गोगी यांची गणना दिल्लीच्या टॉप गुंडांमध्ये होती. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर 4 लाखांचे तर हरियाणा पोलिसांनी त्याच्यावर अडीच लाखांचे बक्षीसही ठेवले होते. दिल्लीच्या नरेला भागात स्थानिक नेते वीरेंद्र मान यांच्या हत्येमध्ये गोगी आणि त्यांचे गुंड सहभागी होते. जितेंद्रवर हरियाणाची प्रसिद्ध गायिका हर्षिता दहियाची हत्या केल्याचा आरोप आहे. दिल्ली आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये हा गुंड पोलिसांच्या निशाण्यावर होता.