मेलेल्या मच्छरांनी भरलेली बाटली घेऊन कोर्टात पोहचला गँगस्टर; कोर्टात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:32 PM2022-11-04T12:32:06+5:302022-11-04T12:32:43+5:30

लकडावालाला एका प्रकरणात मुंबई विशेष सीबीआय कोर्टात आणलं होते. ज्यात तो आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आरोपी आहे.

Gangster reaches court with bottle full of dead mosquitoes; What happened in Mumbai session court? | मेलेल्या मच्छरांनी भरलेली बाटली घेऊन कोर्टात पोहचला गँगस्टर; कोर्टात काय घडलं?

मेलेल्या मच्छरांनी भरलेली बाटली घेऊन कोर्टात पोहचला गँगस्टर; कोर्टात काय घडलं?

googlenewsNext

मुंबई - अलीकडेच मुंबई सत्र न्यायालयात अजब प्रकार समोर आला. याठिकाणी गँगस्टर एजाज उर्फ युसूफ लकडवाला याने कोर्टात मेलेल्या मच्छरांनी भरलेली बॉटल दाखवली. हे पाहून सगळेच हैराण झाले. ही बॉटल दाखवून आरोपीनं तळोजा जेलमध्ये मच्छरदानी वापरण्याची परवानगी द्यावी अशी विनंती कोर्टाला केली. कोर्टाने आरोपीची मागणी फेटाळून लावली. 

लकडावालाला एका प्रकरणात मुंबई विशेष सीबीआय कोर्टात आणलं होते. ज्यात तो आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आरोपी आहे. राजन दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो सुनावणीत हजर होता. लकडवालाने सांगितले की, जेलमध्ये मच्छरांची संख्या खूप आहे. त्यात डीके राव आणि अन्य गँगस्टरला मच्छरदानी वापरण्याची परवानगी दिलीय मग माझ्यासोबत भेदभाव का? माझ्याकडे २ वर्ष मच्छरदानी होती परंतु जेलच्या अधिकाऱ्यांनी ती हिसकावून घेतली असा आरोप त्याने कोर्टात केला. 

यावर विशेष न्यायाधीश एएम पाटील यांनी तळोजा सेंट्रल जेलचे अधीक्षक यांनी सोपवलेल्या रिपोर्टचा आढावा घेतला. जेल अधीक्षकांनी मच्छरदानीसाठी लकडावालाकडून केलेल्या मागणीचा विरोध केला. जेलरने सांगितले की, महाराष्ट्र कारगृह नियमानुसार कैद्यांना मच्छरदानी बांधण्यासाठी रस्सी आणि खिळे देऊ शकत नाही. कैद्यांच्या सुरक्षेसाठी नेट उपलब्ध करून दिला जात नाही. कैदी ओडोमोस किंवा अन्य गोष्टीचा वापर करू शकतात. त्यामुळे कोर्टाने ही विनंती फेटाळावी असं पोलिसांनी म्हटलं. 

सुनावणीनंतर न्यायाधीश पाटील यांनी मच्छरदानीसाठी लकडावालाचा अर्ज फेटाळून लावला. मच्छरांपासून संरक्षणासाठी ओडोमोस किंवा अन्य क्रिमचा वापर करा असं त्यांनी म्हटलं. मुंबईच्या विविध कोर्टात तळोजा जेलमधील कैद्यांकडून मच्छरांबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. गँगस्टर डी के रावसारख्या काही जणांना मच्छरदानीचा वापर करण्याचा कोर्टाने परवानगी दिली होती. त्यामुळे इतर कैदी अर्ज करत आहेत. 

एल्गार परिषदेतील आरोपी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांनी काही आठवड्यापूर्वी वकील दीपा पुंजवानी यांच्या माध्यमातून अर्ज दाखल करत त्यांना दम्याचा त्रास होतो. त्यामुळे तळोजा जेलमध्ये असल्याने ओडोमोस आणि अन्य गोष्टींचा वापर करता येऊ शकत नाही. त्यामुळे मच्छरदानीसाठी परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Gangster reaches court with bottle full of dead mosquitoes; What happened in Mumbai session court?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.