अखेर कुख्यात गँगस्टरला मुंबईत आणले, एकेकाळी रवी पुजारी, छोटा राजनचा हस्तक असलेल्या सुरेश पुजारीकडे होते ८ पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 03:41 PM2021-12-15T15:41:05+5:302021-12-15T16:18:59+5:30

Gangster Suresh Pujari : मंगळवारी इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि CBI अधिकाऱ्यांनी पुजारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Gangster Suresh Pujari brought by maharashtra ATS to Mumbai from delhi | अखेर कुख्यात गँगस्टरला मुंबईत आणले, एकेकाळी रवी पुजारी, छोटा राजनचा हस्तक असलेल्या सुरेश पुजारीकडे होते ८ पासपोर्ट

अखेर कुख्यात गँगस्टरला मुंबईत आणले, एकेकाळी रवी पुजारी, छोटा राजनचा हस्तक असलेल्या सुरेश पुजारीकडे होते ८ पासपोर्ट

Next

फिलिपाइन्समधून प्रत्यार्पण केल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा भारतात आणलेल्या गँगस्टर सुरेश पुजारीला बुधवारी एटीएसनेमुंबईत आणले. त्याला लवकरच ठाण्यातील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुंबई आणि कर्नाटकात खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या या गुंडावर ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवलीत खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.


मंगळवारी इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि CBI अधिकाऱ्यांनी पुजारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथकही दिल्लीला गेले होते.

पुजारी यांच्याविरोधात 'रेड कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली होती
खंडणीच्या अनेक घटनांनंतर मुंबई आणि ठाणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनुक्रमे २०१७ आणि २०१८ मध्ये 'रेड कॉर्नर नोटीस' जारी केली होती. पुजारी १५ वर्षांहून अधिक काळ फरार होता आणि ऑक्टोबरमध्ये फिलिपिन्समध्ये त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर ठाण्यात खंडणीचे एकूण २३ गुन्हे दाखल आहेत. सुरेश हा गँगस्टर रवी पुजारीचा जवळचा नातेवाईक असून २००७ मध्ये त्याच्यापासून अलिप्त झाला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेला.

पुजारीने एकेकाळी छोटा राजनसोबत काम केले होते
गुन्हेगारीच्या क्षेत्रात सुरुवातीच्या काळात त्याने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि रवी पुजारी यांच्यासोबत काम केले आणि नंतर स्वतःची टोळी तयार केली. त्याच्याकडे ८ पासपोर्ट होते. 

Web Title: Gangster Suresh Pujari brought by maharashtra ATS to Mumbai from delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.