गँगस्टर विकास दुबेचा पोलिसांकडून ठरवून एन्काऊंटर? सगळेच संशयास्पद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 04:25 AM2020-07-11T04:25:30+5:302020-07-11T04:27:41+5:30

विकास दुबेने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. हा एन्काउंटर ठरवून केला गेला की काय असा संशय आता व्यक्त होत आहे.

Gangster Vikas Dubey's encounter by police? Everything is suspicious! | गँगस्टर विकास दुबेचा पोलिसांकडून ठरवून एन्काऊंटर? सगळेच संशयास्पद!

गँगस्टर विकास दुबेचा पोलिसांकडून ठरवून एन्काऊंटर? सगळेच संशयास्पद!

Next

लखनऊ: आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. विकास दुबेला गुरुवारी मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याला कानपूरला नेले जात असताना सकाळी ६.३0 च्या सुमारास पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. हा एन्काउंटर ठरवून केला गेला की काय असा संशय आता व्यक्त होत आहे. तेलंगणमध्ये यापूर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणातील संशयितांच्या एन्काउंटरशी याचे बरेच साधर्म्य आहे.

उत्तर प्रदेश एसटीएफच्या गाडीतून विकासला कानपूरला नेले जात होते. त्यावेळी बर्राजवळ गाडीला अपघात झाला. गाडी उलटल्याने विकास दुबे आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र यानंतरही विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने एका एसटीएफ अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले. मात्र विकासने पोलिसांना जुमानले नाही. यानंतर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात विकास दुबे मारला गेला.

विकास दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चकमक सुरू झाली. त्यामध्ये विकास दुबे गंभीर झाला. त्यानंतर त्याला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली.

एका सुरक्षा रक्षकाने विकास दुबेला ओळखल्यामुळे तो पकडला गेला. विशेष म्हणजे त्याआधी विकास दुबे त्या परिसरात फोटो काढत होता. पोलिसांनी अटक केल्यावरही विकासच्या चेहºयावर जराही पश्चाताप दिसत नव्हता. विकास दुबेची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस त्याला गाडीत बसवत असताना तिथे काही लोक गोळा झाले होते. त्यांना पाहून तो ‘होय, मीच विकास दुबे, कानपूरवाला’ असे ओरडला.

विकास दुबेला अटक झाल्याची माहिती मिळताच या बातमीचा मागोवा घेणारे पत्रकार पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत होते. मात्र मध्येच या गाड्या अडवण्यात आल्या. एक पत्रकाराने सांगितले की, आम्ही पोलीस गाडीच्या अगदी नजीक होतो.

अचानक पोलिसांनी आमच्या गाड्या अडविल्या आणि आमच्याकडे ओळखपत्रे मागायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. तथापि, पोलिसांनी मात्र असे काही झाले नाही, असे स्पषट केले.

विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होता, असे असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या नव्हत्या. तो मोकळ्या हाताने दोन पोलिसांच्या मध्ये बसला होता. पोलिस गाडीच्या मागे असणाºया एका पत्रकाराने याला दुजोरा दिला आहे.


८ दिवसांत ५ एन्काऊंटर

कानपूरमध्ये ८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर ८ दिवसात ५ एन्काऊंटर झाले आणि विकास दुबेसह त्याच्या गँगचे ५ सदस्य मारल्या गेले. त्यातील ४ एन्काऊंटरमध्ये जवळजवळ एकसारखेपणा होता. सर्व गुन्हेगार पोलिसांवर हल्ला करीत पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते.

२ जुलै : विकास दुबेला पकडण्यासाठी ३ ठाण्यातील पोलीस बिकरू गावात दबा धरुन बसले. विकास गँगने ८ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती.
३ जुलै : पोलिसांनी सकाळी ७ वाजता विकासचे मामा प्रेमप्रकाश पांडे व सहकारी अतुल दुबे यांचे एन्काऊंटर केले. २० -२२ कुख्यातसह ६० लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले.
५ जुलै : पोलिसांनी विकासचा नौकर व विशेष सहकारी दयाशंकर ऊर्फ कल्लू अग्निहोत्री याला घेरले. पोलिसांच्या गोळीने दयाशंकर जखमी झाला. विकासने योजना आखून पोलिसांवर हल्ला केला होता, असे त्याने
सांगितले.
६ जुलै : पोलिसांनी अमर दुबेची आई क्षमा दुबे व दयाशंकरची पत्नी रेखा यांच्यासह तिघांना अटक केली.
८ जुलै : एसटीएफने विकासच्या जवळच्या अमर दुबेला मारले. प्रभात मिश्रासह १० गुन्हेगारांना अटक केली.
९ जुलै : विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक. प्रभात मिश्रा व बरुआ दुबे एन्काऊंटरमध्ये मारले गेले.
१० जुलै : विकास दुबे एनकाऊंटरमध्ये मारल्या गेला.

भावाच्या आत्म्याला शांती मिळेल शहीद पोलिसाच्या बहिणीची प्रतिक्रिया
कानपूर : विकास दुबे हा एन्काऊंटरमध्ये मारला गेल्याचे समजताच कानपूरमध्ये चकमकीत शहीद झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसले. शहीद पोलीस राहुल यांची बहीण नंदिनी यांनी म्हटले आहे की, आज आमच्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल. विकासच्या फरार साथीदारांनाही पकडण्यात यावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
झांसीच्या भोजला गावातील शहीद सुल्तान सिंह वर्मा यांच्या पत्नी उर्मिला म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता, तो पाळला आहे. या चकमकीत जखमी झालेले अजय कश्यप यांनी म्हटले आहे की, विकासचे एन्काऊंटर शहीद पोलिसांना खरी श्रद्धांजली आहे. यामुळे पोलिसांवरील लोकांचा विश्वास आणखी दृढ होईल.

Web Title: Gangster Vikas Dubey's encounter by police? Everything is suspicious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.