सुदैवाने जीवितहानी टळली, कळव्यात घोलाईनगरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा घरे उद्धवस्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:40 PM2022-03-03T19:40:16+5:302022-03-03T19:41:23+5:30

Gas Cylinder Blast : अग्निशमनसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मदतकार्य

Gas cylinder blast destroys six houses in Gholainagar | सुदैवाने जीवितहानी टळली, कळव्यात घोलाईनगरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा घरे उद्धवस्त  

सुदैवाने जीवितहानी टळली, कळव्यात घोलाईनगरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा घरे उद्धवस्त  

Next

ठाणे: कळव्यातील घोलाईनगरध्मये घरगुती वापराच्या एका सिलेंडरचा स्फोट तर एका सिलेंडरला गळती लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या स्फोटामुळे सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागानेही मदतकार्य राबविले. सुदैवाने, यात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घोलाईनगरातील पारधी पाडा, गणेश वेल्फेअर सोसायटीतील गगनगिरी चाळीमध्ये गुरुवारी सायंकाळी ४.३५ वाजण्याच्या सुमारास दोन सिलींडरचा स्फोट आणि एकाची गळती झाल्याने आग लागल्याची घटना घडली. ही माहिती ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, या पथकासह कळवा पोलीस, वन विभागाचे कर्मचारी, टोरेंट विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी एक फायर इंजिन तसेच एका रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी मदतकार्य राबविले. एक तासाच्या मदतकार्यानंतर ही आग आटोक्यात आली.

यांच्या घरांचे झाले नुकसान
गगनगिरी चाळीतील झोपडपट्टीतील या सहा घरांचे मोठे झाले आहे. राम मोरया, रघुनंदन मोरया, हरिश्चंद्र कनोज्या, राजेंद्र बुरुड, कालू गुप्ता आणि राहुल गुप्ता यांच्या घरांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Web Title: Gas cylinder blast destroys six houses in Gholainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.