Boyfriend सोबत एन्जॉय करण्यासाठी मैत्रिणीला घर दिलं; मित्रानं खासगी क्षण Live पाहिले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 11:30 AM2021-12-23T11:30:34+5:302021-12-23T11:31:31+5:30
बॉयफ्रेंडसोबत या मुलीने खूप एन्जॉय केला. काही खासगी क्षणही दोघांनी शेअर केले. इंटिमेट करताना हे दोघंही इतके गुंग झाले की, बाकी काही विचारही त्यांच्या मनात आला नाही
अनेकदा कपल्सला त्यांचे खासगी क्षण एन्जॉय करण्यासाठी जागा मिळत नाही. तेव्हा एखाद्या मित्राचं घर रिकामे असेल तर त्याठिकाणी जात कपल्स रोमान्स करतात. परंतु दुसऱ्याच्या घरी जाऊन एन्जॉय करणं कितपत सुरक्षित असतं आणि कपल्सना किती भारी पडू शकतं हे एका घटनेवरुन समोर आलं आहे. ज्या मित्राच्या घरी कपल्स एन्जॉय करण्यासाठी गेले तो मित्रच विश्वासघातकी निघाला.
द सन वेबसाइटनुसार, सोशल मीडिया साइटवर रेडिटवर एका मुलीने तिच्यासोबत घडलेल्या अनुभवाचं कथन केले आहे. ही हैराण करणारी घटना ऐकून तुम्हीही शॉक्ड व्हाल. ती म्हणते की, तिचा बॉयफ्रेंड तिला भेटण्यासाठी आला होता. तेव्हा मुलीने तिच्या मित्राकडे मदत मागत त्याच्या घरी गेले. मित्राने स्वखुशीने मैत्रिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला घर दिले. ज्याठिकाणी दोघंही रोमान्स करत होते.
मित्राकडून मदत मागणं युवतीला भारी पडलं
परंतु मित्राकडून मदत मागणे युवतीला भारी पडलं आहे. मुलीने सांगितले की, अनेकदा तिच्या मित्राने घर देण्याची ऑफर दिली होती. परंतु तेव्हा त्या घराची कधीही आवश्यकता भासली नाही. परंतु यावेळी तिचा बॉयफ्रेंड भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर तिला घराची गरज भासली. तिनेही त्या मित्राकडे मदत मागितली आणि बॉयफ्रेंडसोबत त्याच्या घरी पोहचली.
बॉयफ्रेंडसोबत या मुलीने खूप एन्जॉय केला. काही खासगी क्षणही दोघांनी शेअर केले. इंटिमेट करताना हे दोघंही इतके गुंग झाले की, बाकी काही विचारही त्यांच्या मनात आला नाही. त्यानंतर जेव्हा दोघांचा रोमान्स संपत होता आणि तो बॉयफ्रेंड तिथून जात असताना अचानक त्याचे लक्ष खोलीत असणाऱ्या एका कॅम्प्युटरवर पडलं. त्यावर जो वेबकॅम लावण्यात आलेला त्यावर लाईट पाहून त्याला धक्का बसला. त्यानंतर दोघांनी बाजूच्या रुममध्ये बसलेल्या त्या मित्राला गाठलं तेव्हा तो मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडचे खासगी क्षण लाईव्ह पाहत असल्याचं उघड झालं. या गोष्टीवरुन बॉयफ्रेंड आणि त्या मित्रांमध्ये भांडण झालं. मित्रानेच विश्वासघात केल्याने मुलगीही संतापली. आता तिने या प्रकारावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितले आहे.