'मी Gay आहे, मला घटस्फोट दे...', लग्नानंतर पतीने केला धक्कादायक खुलासा आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 03:30 PM2024-02-12T15:30:30+5:302024-02-12T15:30:41+5:30
जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा तरूणीने आपल्या कुटुंबियांकडे याबाबत तक्रार केली तेव्हा प्रकरण मारहाणीवर आलं.
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधून एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. इथे कुटुंबियांनी तरूण समलैंगिक असल्याचं लपवून ठेवलं आणि हुंड्याच्या लालसेपोटी एका तरूणीसोबत लग्न लावून दिलं. जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा तरूणीने आपल्या कुटुंबियांकडे याबाबत तक्रार केली तेव्हा प्रकरण मारहाणीवर आलं. यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली.
नवविवाहित तरूणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, 29 मे 2021 रोजी तिचं लग्न सुरेंद्र कुमार जयस्वालचा मुलगा मनीष कुमारसोबत झालं होतं. तरूणीच्या वडिलाने हुंडा दिला आणि इतर खर्च पकडून 34 लाख रूपये खर्च केले.
पण जेव्हा नवरी आपल्या सासरी पोहोचली तेव्हा तिच्या सासरच्या लोकांचं वागणं चांगलं नव्हतं. पीडितेचा आरोप आहे की, पतीने तिला वैवाहिक शारीरिक सूख दिलं नाही. याची माहिती तिने माहेरी येऊन कुटुंबियांना दिली. यावर आई-वडील म्हणाले की, सगळंकाही ठीक होईल.
सासरहून माहेरी आलेल्या मुलीला कुटुंबियांनी दिलासा दिला की, सगळ्या समस्या दूर होतील चिंता करू नको. त्यानंतर ते तिला तिच्या सासरी घेऊन गेले. आरोप आहे की, यावेळी रस्त्यात सासू ज्ञानवती, सासरा सुरेंद्र आणि तिच्या पतीचा मोठा भाऊ मुकेश त्यांना शिवीगाळ करून तरूणीला मारहाण करू लागले.
पती काय म्हणाला?
सासरी पोहोचलेल्या तरूणीने पती मनीषसोबत झालेल्या रस्त्यातील घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. ज्यानंतर मनीष रडत तरूणीला म्हणाला की, 'मी तुझ्यासोबत दगा केलाय, मला घटस्फोट दे. मी परिवार आणि मामा अमृतलालच्या दबावात येऊन तुझ्यासोबत लग्न केलं. मी एक समलैंगिक आहे'. हे ऐकल्यानंतर महिलेला धक्का बसला.
इथेही वाद झाला आणि त्यानंतर तरूणी आपल्या भावासोबत माहेरी परत आली. तेच पोलिसांनी महिलेच्या सांगण्यावरून तिचा पती, सासू, सासरा, पतीचा मोठा भाऊ आणि त्याचा मामा यांच्याविरोधात हुंड्यासाठी त्रास आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. यावर पोलीस चौकशी करत आहेत.