गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईत पहिल्यांदाच केली अशी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:12 PM2022-01-19T21:12:40+5:302022-01-19T21:13:08+5:30
Gay sex racket exposed : हे आरोपी लोकांना लुटायचे आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असे पोलिसांनी सांगितले.
मायानगरी मुंबईत एका गे सेक्स रॅकेटचापोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पहिल्यांदाच एका गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'ग्राइंडर' या गे ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन डेटिंग गे सेक्स रॅकेटचा काळाधंदा सुरू होता. हे आरोपी लोकांना लुटायचे आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असे पोलिसांनी सांगितले.
पहिल्यांदाच गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पोलिसांनी सांगितले की, ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरली जाते. त्यानंतर ठिकाणाच्या माहितीनुसार सर्व समलिंगी मुलं एकमेकांशी जोडली जातात. आधी ते चॅटवर बोलायचे आणि नंतर एकत्र अनैतिक संबंध ठेवायचे. मालवणी पोलिस स्टेशनचे एसआय हसन मुलाणी यांनी सांगितले की, एका व्यक्तीला पाच जणांनी मारहाण करून त्याच्याकडील पैसे आणि कार्ड हिसकावून घेतले आणि त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओही बनवला, अशी तक्रार आली होती.
संतापजनक! किंचाळ्या ऐकून वडील गेले अन् मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास केला प्रतिकार
पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला
पैसे न दिल्यास आरोपीने तिचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला धमकी दिल्याचे पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले. कसाबसा तो त्यांच्या तावडीतून सुटला आणि त्याने संपूर्ण घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. या तक्रारीच्या आधारे तीन तरुणांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुन्हा या गे सेक्स रॅकेटची माहिती मिळाली.
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली
इरफान फुरकान खान, अहमद फारुकी शेख आणि इम्रान शफीक शेख अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे वय 24 ते 26 वर्षे दरम्यान आहे. दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींकडे चौकशी करून या गोरखधंद्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.