हॉटेलमध्ये तरूणींसोबत मौज-मजा करत होता 'डॉन', पोलिसांनी धाड टाकत आक्षेपार्ह स्थितीत केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 18:09 IST2022-01-20T18:08:21+5:302022-01-20T18:09:20+5:30
Bihar Crime News : गयामध्ये कोलकात्यातील तरूणींसोबत मजा करणारा कुख्यात गुन्हेगार चिंटू पांडे उर्फ चिंटू बाबा याला पोलिसांनी अटक केली.

हॉटेलमध्ये तरूणींसोबत मौज-मजा करत होता 'डॉन', पोलिसांनी धाड टाकत आक्षेपार्ह स्थितीत केली अटक
Bihar Crime News : बिहारमधील एका कुख्यात डॉनला त्याच्या प्रेयसीला भेटणं इतकं महागात पडलं की हॉटेलच्या बेडरूममधून तो थेट तुरूंगात पोहोचला. ही घटना गया (Gaya) जिल्ह्यातील आहे. गयामध्ये कोलकात्यातील तरूणींसोबत मजा करणारा कुख्यात गुन्हेगार चिंटू पांडे उर्फ चिंटू बाबा याला पोलिसांनी अटक केली. ज्या चिंटूला अटक करण्यात आली त्याच्या विरोधात एकट्या गयामध्येच अनेक केसेस दाखल आहेत.
काही दिवसांपूर्वीच म्हणजे १५ जानेवारीला भरदिवसा गयामध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात चिंटूचाही शोध घेणं सुरू होता. चिंटू बोधगयामधील एका गेस्ट हाऊसमध्ये आपल्या प्रेयसीसोबत मजामस्ती करायला आला होता. यादरम्यान पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी यावेळी कोलकाताच्या सोनागाछीमधून आलेल्या दोन तरूणींनाही ताब्यात घेतलं. तसेच गेस्ट हाउसच्या मॅनेजरलाही अटक केली आहे.
याप्रकरणी एसपी राकेश कुमार म्हणाले की, कुख्यात गुन्हेगार चिंकू पांडे याने काही दिवसांपूर्वी मानपूरमध्ये प्रिन्स नावाच्या एका तरूणाची हत्या केली होती. सोबतच त्याच्या विरोधात इतरही अनेक गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांना सूचना मिळाली होती की, चिंकू पांडे गयातील गेस्ट हाऊसमध्ये मजामस्ती करत आहे. त्यानंतर त्याला धाड टाकून अटक करण्यात आली.
यावेळी कुख्यात आरोपी आक्षेपार्ह स्थितीत पकडला गेला. सोबतच काही आक्षेपार्ह वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या. एसपी राकेश कुमार म्हणाले की, गेस्ट हाऊसच्या मॅनेजरकडून दोन्ही तरूणींना बाहेरून बोलवून चुकीचं काम केलं जात होतं. पोलिसांनी गेस्ट हाऊस सील केलं आहे.