पिस्तुल विकण्यास आलेला एक तरुण साथीदारासह गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 08:36 PM2018-09-17T20:36:41+5:302018-09-17T20:37:04+5:30
शिवरतन यादव व दिनेश कुमार विश्वकर्मा या दोघांची नवे असून शिवरतन हा कल्याण पूर्वकडील चेतना परिसरात तर दिनेश कुमार हे ठाणे येथे राहणारे आहेत .या दोघांकडून एक पिस्तुल व २ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
कल्याण -कल्याण स्टेशन परिसरात पिस्तुल व काडतुसे विकण्यास आलेल्या एका तरुणांला महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले त्याच्याकडून चौकशी दरम्यान हे पिस्तुल त्याच्या मित्राकडून आणल्याही कबुली दिली पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून शिवरतन यादव व दिनेश कुमार विश्वकर्मा या दोघांची नवे असून शिवरतन हा कल्याण पूर्वकडील चेतना परिसरात तर दिनेश कुमार हे ठाणे येथे राहणारे आहेत .या दोघांकडून एक पिस्तुल व २ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती पिस्तुल व काडतुसे विकण्यास येणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे यांच्या पथकातील पोलीस हवालदार काटकर, भोईर, माने, पोलीस शिपाई सानप, नागरे, पवार यांनी काल सायंकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी शिवरतन यादव संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तुल व काडतुस आढळली. त्याने हे पिस्तुल ठाणे येथे राहणाऱ्या दिनेशकुमार विश्वकर्मा याच्याकडून आणल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनेश कुमार विश्वकर्मा याला अटक केली. या दोघांनाही कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.