३० हजारात गर्भलिंग निदान; ११ हजार डॉक्टरच्या खिशात; वर्षभराचे कॉल डिटेल्स मागविले
By सोमनाथ खताळ | Published: January 9, 2024 06:10 AM2024-01-09T06:10:03+5:302024-01-09T06:10:48+5:30
घराची झडती, पण हाती काहीच नाही
सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: गेवराईतील गर्भलिंग निदान प्रकरणातील रेट कार्ड समोर आले आहे. यामध्ये एका तपासणीला २५ ते ४० हजार रुपये घेतले जात होते. डमी रुग्णाकडूनही ३० हजार रुपये घेतले. यातील ५ हजार रुपये घरमालक चंद्रकांत चंदनशिव, ११ हजार रुपये डॉ. सतीश गवारे, तर राहिलेले १४ हजार रुपये मनीषा सानप स्वत:कडे ठेवत होती, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी मनीषाचे वर्षभराचे कॉल डिटेल्स मागविले आहेत. त्यातून संपर्कात कोण कोण हाेते, हे समजणार आहे. गर्भलिंग प्रकरणाचा ५ जानेवारीला पोलिस, आरोग्य विभागाने कारवाई करून पर्दाफाश केला होता.
घराची झडती, पण हाती काहीच नाही
मनीषाचे गेवराई शहरातच ३ मजली टोलेजंग घर आहे. येथे सध्या तिचे नातेवाईक आणि काही भाडेकरू राहतात. कारवाईनंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली.