म्होरक्या अवघ्या १७ वर्षाचा असणाऱ्या जर्मन टोळीला मोक्का कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 08:36 PM2018-09-05T20:36:23+5:302018-09-05T20:36:34+5:30

बाल गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अवघ्या १७ वर्षाचा आरोपी म्होरक्या असलेल्या जर्मन टोळीतील सहाही जणांना खून केल्याप्रकरणी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

A German clan with only 17 years of captivity | म्होरक्या अवघ्या १७ वर्षाचा असणाऱ्या जर्मन टोळीला मोक्का कोठडी

म्होरक्या अवघ्या १७ वर्षाचा असणाऱ्या जर्मन टोळीला मोक्का कोठडी

Next

पुणे : बाल गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अवघ्या १७ वर्षाचा आरोपी म्होरक्या असलेल्या जर्मन टोळीतील सहाही जणांना खून केल्याप्रकरणी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष मोक्का न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत मोक्का कोठडी सुनावली.   

        संतोष बाळू बाबर (वय २०), किरण उर्फ  आप्पासो वडर (वय २०), साहेल सिराज शेख (वय २१), अक्षय बबन कल्ले (वय २०), विद्यासागर उर्फ  राजेश उर्फ लाज्या नामदेव चव्हाण (वय २४) आणि आसिफ उर्फ आशपाक महंमद शेख (वय २०, सर्व रा. इचलकरंजी, हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. राम कचरू गरड (वय ३२, रा. हातकणंगले) याचा २३ जुलै रोजी चाकू, कु -हाड, तलवार आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. टोळीचा म्हो-हक्या १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी असून त्याची रवानगी कोल्हापूर येथील सुधारगृहात करण्यात आली आहे. 

          टोळीवर काही महिन्यांपुर्वी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्क्याला घाबरून काही सदस्यांनी टोळी सोडल्याने सदस्यसंख्या कमी झाली होती. त्यामुळे टोळीची ताकद वाढविण्यासाठी आरोपींनी गरड याला गॅगमध्ये सहभागी होण्याची विचारणा केली होती. परंतु, गरड याने त्यात नकार दिला. त्यामुळे चिडून जाऊन आरोपींनी गरड याचा खून केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी सहा जणांना पुणेन्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकीलांनी गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी विरोध केला. जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे पुढील तपास करीत आहेत. 

टोळीप्रमुखावर १२ गंभीर गुन्हे 

टोळीच्या माध्यमातून दशहत पसरवून नागरिकांना वेठीस धरणा-या जर्मन टोळीचा म्होरक्या हा अल्पवयीन असून केवळ सतरा वर्षाचा आहे. त्याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये १२ गंभीर गुन्हे दाखल आहे. तर इचलकरंजी पोलीस ठाण्यात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: A German clan with only 17 years of captivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.