लवकरात लवकर फासावर लटकवा! निर्भयाच्या आईची दोषीच्या याचिकेविरोधात कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 09:53 PM2019-12-13T21:53:00+5:302019-12-13T21:54:24+5:30
दोषी आरोपी अक्षयच्या पुनर्विचार याचिका दाखल असून त्यावर निर्णय येण्याआधी डेथ वॉरंट जारी करू शकत नाही.
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत घडलेलं निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींनी फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी यासाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी कोर्टाकडे विनंती केली आहे. तर फाशी टाळावी यासाठी दोषी आरोपी अक्षय ठाकूरकडून पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहेत. दोषी अक्षयने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेविरोधात निर्भयाच्या आईने देखील पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे. पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून यावर १७ डिसेंबरला सुनावणी घेण्यात येणार आहे. तर त्यानंतर १८ डिसेंबरला दुपारी २ वाजता निर्भयाच्या आईच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
निर्भयाच्या आईने दोषीच्या पुनर्विचार याचिकेमुळे आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस उशीर होत असल्याने याचिका दाखल केली आहे. चार दोषी आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच डेथ वॉरंट चारही दोषींविरोधात जारी करण्याबाबत सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. सतीश कुमार अरोरा यांनी पुढे ढकलत १८ डिसेंबरला ठेवली आहे. त्यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयात दोषी आरोपी अक्षयच्या पुनर्विचार याचिका दाखल असून त्यावर निर्णय येण्याआधी डेथ वॉरंट जारी करू शकत नाही.
चौघांची उडाली झोप; मारतात फक्त चक्करा
निर्भया सामूहिक बलात्कारातील अक्षय, मुकेश आणि मंडोली कारागृहातून तिहार कारागृहात हलविलेला पवन हे तीन दोषींना तिहार कारागृहातील वॉर्ड नंबर - ३ मधील सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर चौथा आरोपी विनय याला जेल नंबर - ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. य सर्वांची झोप उडाली आहे. फाशीची तारीख जवळ येत असल्याने यांच्या मानत भीती निर्माण झाली आहे. हे चौघे आपापल्या सेलमध्ये रात्र - रात्र जागून चक्करा मारत असतात. दोषींना औषध देण्यात आले नसून या चौघांना रक्तदाब योग्य राहील अशा पद्धतीचे द्रव आणि घन पदार्थ खाण्यास दिले जात आहेत.
Nirbhaya case: Victim's mother moves SC opposing one of the 4 death-row convicts' review plea, which is slated to be heard on Dec 17
— Press Trust of India (@PTI_News) December 13, 2019
Delhi: Additional Sessions Judge Satish Kumar Arora adjourned the hearing on plea of Nirbhaya's parents seeking issuance of death warrant and execution of all convicts, till 18th December
— ANI (@ANI) December 13, 2019