घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 01:12 PM2018-08-08T13:12:46+5:302018-08-09T05:42:43+5:30

२००२ मध्ये मुंबई येथील घाटकोपर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस गुजरातच्या एटीएस पथकाने स्थानिक एटीएसच्या मदतीने ताब्यात घेतले.

Ghatkopar blast accused arrested from Aurangabad | घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक 

घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीस औरंगाबादेतून अटक 

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबईतील घाटकोपर परिसरात २००२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार शेख या अब्दुल शेख अब्दुल रहमान चाऊस ( वय ४३ वर्षे, रा. कैसर कॉलनी, रोशन गेट, औरंगाबाद) याला मंगळवारी रात्री मुंबई गुन्हे शाखेने येथील एका रुग्णालयातून ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्याची ट्रांझिस्ट कोठडी मिळाल्यानंतर पोलीस त्याला घेऊन बुधवारी दुपारी मुंबईला रवाना झाले.
घाटकोपरच्या भीषण बॉम्बस्फोटात दोन जण ठार, तर ४९ जण जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तपास करून आतापर्यंत २० आरोपींना अटक केलेली आहे. आठ आरोपी वाँटेड आहेत. त्यामध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या शेख याह्याचा समावेश होता. अहमदाबाद येथील एका गुन्ह्याचा तपास करीत असताना तो चोरट्या मार्गाने काही दिवसांपूर्वी भारतात आल्याचे पोलिसांनी समजले होते. तेव्हापासून एटीएस त्याच्या मागावर होते. तो औरंगाबादेत राहणाऱ्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी येणार असल्याचे कळले. गुजरात एटीएसचे पोलीस निरीक्षक ब्रह्मभट्ट यांनी याबाबतची माहिती मुंबई एटीएस आणि गुन्हे शाखेला दिली होती.

>ट्रांझिट रिमांड
आरोपीला अटक केल्यानंतर बुधवारी सकाळी त्याची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपीला मुंबईला घेऊन जायचे असल्याने त्याला ट्रांझिट कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली.

Web Title: Ghatkopar blast accused arrested from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.