घाटकोपर हिरे व्यापारी हत्या प्रकरण : देबोलिना म्हणते; माझी चूक नाही तर मी का घाबरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 03:34 PM2019-01-15T15:34:53+5:302019-01-15T20:03:38+5:30

पोलिसांनी तिला 9 डिसेंबर 2018 रोजी चौकशीसाठीही बोलावले होते. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. ‘माझी काही चूक नाही तर मी कशाला घाबरू’ असा प्रश्न  तिने विचारला आहे.

Ghatkopar diamond businessman murder case; debolina saying why should i worried if i am not guilty | घाटकोपर हिरे व्यापारी हत्या प्रकरण : देबोलिना म्हणते; माझी चूक नाही तर मी का घाबरू 

घाटकोपर हिरे व्यापारी हत्या प्रकरण : देबोलिना म्हणते; माझी चूक नाही तर मी का घाबरू 

Next
ठळक मुद्देसचिन पवारला अटक झाल्यानंतर आपल्याला मोठा धक्का बसल्याचं देबोलिनाने सांगितलं आहे. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे.चौकशीदरम्यान पोलिसांनी मला काहीही त्रास दिला नाही. 

मुंबई - घाटकोपरमधील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये छोट्या पडद्यावर मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारणाऱ्या देबोलिना भट्टाचर्जीचे नाव असल्याची चर्चा रंगली होती. पोलिसांनी तिला 9 डिसेंबर 2018 रोजी चौकशीसाठीही बोलावले होते. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. ‘माझी काही चूक नाही तर मी कशाला घाबरू’ असा प्रश्न  तिने विचारला आहे.

या प्रकरणातील आरोपी सचिन पवार आणि देबोलिनाचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. या चर्चेमुळे पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीदरम्यान पोलिसांनी मला काहीही त्रास दिला नाही. मूळची आसामची रहिवासी असलेली देबोलिना हिने सांगितलं की माझी आणि सचिन पवारची चांगली मैत्री असून आम्ही दोघे आसामला कामाख्या मंदिरात दर्शनासाठीही गेलो होतो. आमची दोघांची ओळख एका प्रचार रॅलीदरम्यान झाली होती आणि त्यानंतर आम्ही काही डॉक्युमेंट्रीवर काम करीत होतो. राजेश्वर उदानी आणि आपली फक्त तीनदा भेट झाली होती आणि त्यांच्याशी ओळख  त्यांच्या मुलीच्या लग्नात झाल्याचं देबोलिनाने सांगितलं आहे.

सचिन पवारला अटक झाल्यानंतर आपल्याला मोठा धक्का बसल्याचं देबोलिनाने सांगितलं आहे. सचिन पवारसोबत प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेबाबत बोलताना देबोलिनाने आम्ही दोघे चांगले मित्र असून प्रेमसंबंधांबाबतच्या चर्चा या अफवा आहे. सचिन पवारला अटक झाल्यानंतर आमची पोलीस स्थानकात भेट झाली होती अशी माहिती दिली. या भेटीदरम्यान मी त्याला विचारलं होतं की नेमकं काय झालेलं असंही तिने सांगितलं. या आरोपांचा आपल्या करिअरवर काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा देबोलिनाने केला आहे.

Web Title: Ghatkopar diamond businessman murder case; debolina saying why should i worried if i am not guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.