प्रेमाचा दुर्दैवी अंत! वाढदिवसाच्या दिवशीच पतीनं पत्नीला दिली थरकाप उडवणारी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:54 AM2022-01-11T11:54:22+5:302022-01-11T12:01:37+5:30

पोलिसांनी हॉटेल रजिस्टर चेक केले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रियंकाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.

Ghaziabad Husband Killed Wife In Hotel They Got Love Marriage Two And Half Years Ago | प्रेमाचा दुर्दैवी अंत! वाढदिवसाच्या दिवशीच पतीनं पत्नीला दिली थरकाप उडवणारी भेट

प्रेमाचा दुर्दैवी अंत! वाढदिवसाच्या दिवशीच पतीनं पत्नीला दिली थरकाप उडवणारी भेट

Next

गाजियाबादच्या एका हॉटेलमध्ये सोमवारी पतीने पत्नीला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावलं आणि त्यानंतर तिला भयानक गिफ्ट दिलं ज्याचा कुणीही विचार केला नाही. अडीच वर्षात प्रेम, लग्न आणि हत्या असा दु:खद प्रवास ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. सुरुवातीला अर्जुन आणि प्रियंकाने घरच्यांच्या मर्जीविरोधात कोर्टात जाऊन लग्न करण्याची धमकी दिली. परंतु त्यानंतर घरच्यांनीच दोघांचे लग्न लावून दिले. प्रेमाच्या या नात्यात हुंड्याची गोष्ट कधी आडकाठी येईल असं वाटलं नाही.

मृत प्रियंकाचा भाऊ चंचलने आरोप केलाय की, अर्जुन वारंवार हुंड्याची मागणी करत होता. त्यासाठी त्याने प्रियंकाला मारहाण करत करंटही दिला होता. हे प्रियंकाच्या कुटुंबाला कळताच ते प्रियंकाच्या सासरी पोहचले तेव्हा आरोपी त्यांना बघून पळाला. इतकचं नाही तर आरोपी पतीने अनेकदा प्रियंकाच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी लग्नानंतर एका पेट्रोल पंपावर काम करत होता. काही महिन्यांनी ते काम सोडले. प्रियंकाला होणारी मारहाण आणि अन्य प्रकरणात आरोपीविरोधात बुऱ्हाडी पोलीस ठाण्यात तक्रारी आहेत.

हॉटेलमध्ये नव्हते सीसीटीव्ही, कुणीही ऐकला नाही आवाज

नातेवाईकांनी हॉटेलच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. हॉटेलमध्ये कुठेही सीसीटीव्ही नाहीत. घटनेच्या काही वेळेपूर्वी अर्जुन आणि प्रियंका यांच्या वादविवाद झाला. मग हॉटेल कर्मचाऱ्यांपैकी कुणीही आवाज ऐकला नाही. पोलिसांनी हॉटेल रजिस्टर चेक केले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रियंकाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.

अर्जुन आणि प्रियंका दोघंही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. अडीच वर्षापूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेजबाबत घरात सांगितले. तपासणी केली असता कुठलेही कागदपत्रे सापडले नाहीत. पण दोघांच्या कुटुंबीयांनी एकमेकांशी संवाद साधत लग्न लावून दिले. लग्नाच्या सहा महिन्यांनतर अर्जुन आणि प्रियंका यांच्यात हुंड्याच्या पैशावरुन वादविवाद सुरु झाले. हे वाद कायम सुरुच होते. प्रियंका आणि अर्जुनची दीड वर्षाची मुलगी नित्या हिच्यावर वादाचा परिणाम होऊ लागला. आता प्रियंकाच्या मृत्यूनंतर मुलगी नित्या कुणाकडेही जात नसून या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Ghaziabad Husband Killed Wife In Hotel They Got Love Marriage Two And Half Years Ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.