संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आला म्हणून मुस्लीम मुलाला बेदम मारहाण, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:27 AM2021-03-14T08:27:28+5:302021-03-14T08:32:57+5:30
Crime News : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुस्लीम धर्मीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुस्लीम धर्मीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलाला मारहाण करणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. आरोपीनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा मारहाण करतानाचा व्हिडीओ शेअर झाला आहे. या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन गाझियाबाद पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला अटक करण्यात आली. अश्वनीकुमार यादव याचा मुलगा श्रृंगी नंदन यादव याला मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी एक संघटनेशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हि़डीओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
उपरोक्त वीडियो का तत्काल संज्ञान लेकर टीम गठित कर मार पिटाई करने वाले व्यक्ति- श्रृंगी नंदन यादव पुत्र अश्वनी कुमार यादव निवासी गोपालपुर थाना संवारा भागलपुर बिहार को हिरासत में लिया गया एवं मुकदमा पंजीकरण/वैधानिक कार्रवाई संबंधी प्रक्रिया प्रचलित की गई pic.twitter.com/QBYdMI741O
— GHAZIABAD POLICE (@ghaziabadpolice) March 12, 2021
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी श्रृंगी यादव एका मुलाला त्याचं आणि वडिलांचं नाव विचारताना दिसत आहे. मुलाच्या नावावरून तो मुस्लीम धर्मीय असल्याचं लक्षात येत आहे. 'तू मंदिरात प्रवेश केलासच कसा?' असा प्रश्न विचारत आरोपी मुलाला बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तर ज्या मुलाला मारहाण करण्यात आली तो आपण 'पाणी पिण्यासाठी मंदिरात आलो होतो' असं उत्तर देतानाच मारहाण न करण्याची विनंती करताना दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ओडिशात खळबळ! विधानसभेत आमदाराने असं कृत्य करण्यामागे "हे" आहे नेमकं कारण?https://t.co/HoqGF3OsNL#OdishaAssembly#Odisha#BJP#SubhashChandraPanigrahi#Suicide
— Lokmat (@MiLOKMAT) March 13, 2021
माणुसकीला काळीमा! चालत्या कारमध्ये तब्बल 12 जणांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार; Video व्हायरल
देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. चालत्या कारमध्ये तब्बल 12 जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पीडितेला बोलावून घेत तक्रार दाखल करुन घेतली आणि याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. ही घटना 6 महिन्यांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात असून वेगवेगळ्या तीन कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार आणि मारहाण करण्यात आली आहे.
"जातीय दंगलींना आळा तर बांगलादेशातून झाली सर्वाधिक घुसखोरी"https://t.co/mErmTKib83#crime#Rape#Murder#Indiapic.twitter.com/cnrqLdalgg
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021