एकाचवेळी दोघींसोबत लिव्ह इनमध्ये राहिला, पहिलीला फिरण्यासाठी कुल्लूला नेलं, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 10:13 AM2022-12-24T10:13:03+5:302022-12-24T10:13:24+5:30
युवतीचा शोध घेत घेत सात महिने उलटले तरी पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या कालावधीत युवकानं पोलिसांनी अनेकदा दिशाभूल केली.
गाजियाबाद - उत्तर प्रदेशातील गाजियाबाद इथं वसुंधरामध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एक युवक दोन युवतींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या दोघींना त्याने वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने घेतलेल्या घरी ठेवले होते. एकेदिवशी पहिल्या युवतीला दुसऱ्या युवतीबाबत माहिती पडलं. तिने याला विरोध केला तेव्हा आरोपी युवकानं फिरण्याच्या बहाण्याने तिला हिमाचलला घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने २ वर्षाच्या मुलीसमोरच युवतीचा गळा दाबून मारून टाकलं.
त्यानंतर आरोपी युवकाने दरीत युवतीचा मृतदेह ढकलला आणि तिथून पळ काढला. युवकानं दुसऱ्या युवतीसोबत लग्न करून असं राहू लागला जसं काहीच झालं नाही. ही घटना ७ महिन्यापूर्वीची आहे. पोलिसांनी मृत युवतीची बेपत्ता नोंद घेत तपास सुरू केला. त्यावेळी संशयाच्या आधारे पोलिसांनी युवकाची चौकशी केली. सुरुवातीला पोलिसांची आरोपीने दिशाभूल केली. परंतु खाकीचा धाक दाखवताच आरोपी युवकाने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी सांगितले की, भोपुरा इथं आरोपी रमन गॅरेजमध्ये काम करायचा. मे महिन्यात त्याने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीची कुल्लू इथं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह दरीत फेकून दिला. त्याठिकाणाहून परतल्यानंतर आरोपीने स्वत: पोलिसांकडे जात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. युवतीचा शोध घेत घेत सात महिने उलटले तरी पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या कालावधीत युवकानं पोलिसांनी अनेकदा दिशाभूल केली. त्यानंतर आरोपीच्या जबाबावर युवतीच्या आईला संशय झाला. त्यानंतर पोलिसांनी या युवकाला खाकीचा धाक दाखवत चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी केली हत्या
आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, मी दोन मुलींसोबत लिव्ह इनमध्ये राहत होतो. ३ मे रोजीच मी दुसऱ्या मुलीशी लग्न केले होते. मात्र मृत मुलीला हा प्रकार कळला आणि तिने विरोध सुरू केला. अशा स्थितीत तब्बल १५ दिवसांनी फिरण्याच्या बहाण्याने मी तिला हिमाचलला नेले आणि गळा आवळून खून केला. त्यावेळी मयत मुलगी तीन महिन्यांची गरोदर होती. तिला आधीच दोन वर्षांची मुलगी होती. आरोपीने मुलीसमोरच हा प्रकार घडल्याचे सांगितले.
मोबाईलच्या लोकेशनवरून उघड झाले रहस्य
पोलिसांनी मुलीच्या मोबाईलची माहिती विचारली, मात्र आरोपी रमणने असे उत्तर दिले की ज्याने पोलिसांनाही संशय आला. यानंतर पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स काढले. यामध्ये मुलीच्या फोनचा शेवटचा कॉल कुल्लू या लोकेशनचा असल्याचे आढळून आले. त्यावेळी रमणच्या मोबाईलचे लोकेशनही तेच होते. यानंतर पोलिसांनी त्याच्या फ्लॅटच्या आजूबाजूला १७ मेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये आरोपीसह तरुणी कारमध्ये बसलेली दिसली. संशय बळावत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.