संशयाचे भूत डोक्यात शिरले अन् पतीने पत्नीचे डोके पाट्याने ठेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 12:59 PM2021-12-11T12:59:55+5:302021-12-11T13:00:40+5:30
Murder Case : पत्नी सुनिता आणि मुलगी साखर झोपेत असताना त्याने मसाला तयार करण्याचा दगडी पाटा पत्नीच्या डोक्यात टाकला.
स खरखेर्डा : संशयातून पत्नीची डाेक्यात पाटा टाकून पतीने हत्या केली़ ही घटना साखरखेर्डा येथील वार्ड क्र ५ मध्ये ११ डिसेंबर राेजी सकाळी पाच वाजता घडली़साखरखेर्डा येथील संजय पांडुरंग गवई आणि पत्नी सुनिता व तिनं मुलांसह वार्ड क्रमांक पाच मध्ये राहतात . त्यांची एक मुलगी १२वी मध्ये शिकत असून ती रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करत होती ़ बाबा झोपानं , मला अभ्यास करायचा ! तर संजय म्हणाला तु झोप , असा संवाद झाला .परंतू संजयच्या डोक्यात संशयाचे भूत कालवा कालव करीत होते . व्यसनाधीन झालेल्या संजयच्या डोक्यावर परिणाम झाल्याची माहिती निकटच्या नातेवाईकांनी दिली . तो रात्रभर झोपला नाही . घरात चकरा मारतच राहिला . सकाळी ४:३० वाजता मुलगा व्यायाम करण्यासाठी गेला . डोक्यात संशयाचे भूत कायम घुटमळत असतांना सकाळी पाच वाजता पत्नी सुनिता आणि मुलगी साखर झोपेत असताना त्याने मसाला तयार करण्याचा दगडी पाटा पत्नीच्या डोक्यात टाकला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले . डोक्याच्या चिंधड्या उडाल्या , रक्तामासाचा सडा पडला , बापाने केलेल्या कृत्य पाहून मुलगी जाम हादरली . घर टेकडीवर असल्याने रडण्याचा , ओरडण्याचा आवाज ऐकून भिम नगर जागे झाले . शेजारी राहणारे माजी सैनिक अर्जुन गवई , अमोल गवई , बी के गवई , माजी सरपंच कमलाकर गवई तत्काळ घटणास्थळी दाखल झाले . उपरोक्त घटणा पाहून सर्वांनाच धक्का बसला . संजय गवई याने पोलीस स्टेशन मध्ये जावून उपरोक्त प्रकरणाची माहिती दिली आणि पोलीसांच्या स्वाधीन झाला. सकाळी ठाणेदार जितेंद्र आडोळे , पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास वैराळ यांनी मृतक सुनिता संजय गवई यांच्या देहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आराेपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़