मुंबईहून अपहरण केलेल्या मुलीची साताऱ्यात सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 09:57 PM2020-09-23T21:57:07+5:302020-09-23T21:58:30+5:30

एलसीबीची कारवाई; दोघेही बोरवली पोलिसांच्या स्वाधीन

Girl abducted from Mumbai released in Satara | मुंबईहून अपहरण केलेल्या मुलीची साताऱ्यात सुटका

मुंबईहून अपहरण केलेल्या मुलीची साताऱ्यात सुटका

googlenewsNext
ठळक मुद्देयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कस्तुरबा मार्ग (मंबई) येथील पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

सातारा:  मुंबई येथून अल्पवयीन मुलीचे अहपरण करणार्‍या संशयिताला सातारा एलसीबीने जेरबंद करून मुलीची सुटका केली. संबंधित मुलीला मालट्रकमध्ये बसून कोल्हापूरकडे जात असताना पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला साताऱ्यात पकडले.  
 

दिनेश परशुराम शिर्के (वय २२, रा. कुलुपवाडी इंदिरानगर बोरिवली पूर्व मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कस्तुरबा मार्ग (मंबई) येथील पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित त्या मुलीला घेऊन सातारा परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने सातारा बसस्थानक, लॉजेस व परिसरामध्ये तसेच महामार्गावर शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महामार्गावर पेट्रोलींग करत असताना सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयित व अल्पवयीन मुलगी कोल्हापूरकडे जाणार्‍या एक मालट्रकमध्ये बसून जाताना दिसून आले. पोलिसांनी लगेच संबंधित वाहनाचा पाठलाग करून संशयित आरोपीस ताब्यात घेतले व सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन पोलिसांनी तिची सुटका केली. 


अपहृत अल्पवयीन मुलगी व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे बोरीवली पूर्व मुंबई यांच्याकडील पथकाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील  यांच्या मार्गदशनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार दीपक मोरे,  शरद बेबले, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, चालक संजय जाधव, मोना निकम, राधा जगताप, तनुजा शेख आदींनी ही कारवाई केली केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

oo

 

Web Title: Girl abducted from Mumbai released in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.