दत्तक घेतलेल्या मुलीने आखला होता आई-वडिलांच्या हत्येचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 10:13 PM2019-10-09T22:13:50+5:302019-10-09T22:13:59+5:30
अमेरिकत दाम्पत्याने 2010 साली एका 8 वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते.
वॉशिंग्टन - अमेरिकत दाम्पत्याने 2010 साली एका 8 वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते. मात्र, काही दिवस उलटल्यानंतर तिच्या शारीरिक वाढीच्या हालचालींसंदर्भात त्यांना संशय आला. त्यांनी डॉक्टरांना दाखवले असता ही मुलगी 8 वर्षांची नव्हे, तर ती 14 वर्षांपेक्षा मोठी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
विशेष म्हणजे त्या दत्तक घेतलेल्या मुलीचे मनसुबेही काही वेगळेच होते. ती दत्तक घेतलेली मुलगी तिच्या आईच्या सांगण्यावरून त्या दाम्पत्याच्या हत्येचा कट रचत होती. नटालिया असं या मुलीचं नाव असून, ती एका दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहे. हा सगळा प्रकार आता उघड झाल्यानंतर दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी तिला सोडून दिले आहे. या मुलीचं वय 30 वर्ष असावं, असा अंदाज आहे. मुलीची आई मात्र ती 16 वर्षांचीच असल्याचे सांगते.
आपली मुलगी विकलांग असल्यामुळे तिला आपण दत्तक दिलं, असं तिची आईचे म्हणणे आहे. नटालिया ही मूळची यूक्रेनची आहे. ज्या बर्नेट दाम्पत्याने नटालियाला दत्तक घेतलं ते दोघंही तिला एकटीला घरात ठेवून कॅनडाला निघून गेले. या मुलीने आपल्या हत्येचा कट रचला, असा दत्तक घेतलेल्या आई-वडिलांचा आरोप आहे. पोलिसांना नटालिया एका फ्लॅटमध्ये सापडली. बर्नेट दाम्पत्यावर आता या मुलीला सोडून देण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटी जन्मतारीख
नटालियाला राज्य मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे देखील दुसऱ्यांच्या जिवाला तिच्यापासून धोका निर्माण झाला होता. तेथे नर्सला तिने तिचे वय १८ असल्याचे सांगितले. २०१२ साली डॉक्टरांनी केलेल्या नोंदीनुसार तिचा जन्म २००३ साली जन्म झालेला नाही आहे. याआधी मायकल क्रिस्टीन यांनी आरोप केला आहे की, या मुलीचे वय ३० वर्ष आहे.