ज्या मित्राला पार्टीसाठी घरी बोलावले; त्यानेच बलात्कार केला, तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 04:58 PM2021-06-11T16:58:37+5:302021-06-11T17:01:51+5:30

Rape case in vadodara: तरुणी कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरीदेखील करत होती. एक दिवस तिने त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांसाठी तिच्या घरी पार्टी ठेवली होती.

girl arrange liquor party in her house, colleague friend raped her, commit suicide | ज्या मित्राला पार्टीसाठी घरी बोलावले; त्यानेच बलात्कार केला, तरुणीची आत्महत्या

ज्या मित्राला पार्टीसाठी घरी बोलावले; त्यानेच बलात्कार केला, तरुणीची आत्महत्या

Next

कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. (girl arrange liquor party in her house, friend raped)

तरुणी कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरीदेखील करत होती. एक दिवस तिने त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांसाठी तिच्या घरी ओली पार्टी ठेवली होती. दारुच्या नशेत शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. या धक्कात तिने आत्महत्या केली. घटना गुजरातच्या बडोद्याची आहे. 

बडोद्याच्या लक्ष्मीपुरा भागात राहणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. बडोद्यामध्ये ती शिक्षणासाठी आली होती आणि भाड्याने राहत होती. तिच्या आईचा 6 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या सहकाऱ्यांसोबत दारुच्या पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी तिच्या घरी तिचा मित्र आणि दोन तरुण आले होते. दिशांत कहार आणि नाझिम इस्माईल रहीम मिर्झा अशी त्यांची नावे होती.
 
तरुणीने तिच्या या मित्रांसोबत खूप दारु घेतली आणि ती बेहोश झाली. या तिच्या परिस्थितीचा फायद घेऊन दिशांतने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा दुसऱा दिवस उजाडला तेव्हा तिला शुद्ध आली. तेव्हा तिला आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याचा अंदाज आला. तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. 

तिने लगेचच तिच्या एका जवळच्या मैत्रिणीशी संपर्क केला. तिला घडलेली घटना सांगितली. त्या मैत्रिणीने पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्या तरुणीने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे. 

एसीपी बकुल चौधरी यांनी सांगितले की, तरुणीचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. अजून त्याचा अहवाल आला नाहीय. मात्र सुरुवातीच्या चौकशीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिशांतला बलात्कार प्रकरणी आणि त्याच्या मित्रांना त्याला मदत केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. तरुणीने तिच्या मैत्रिणीशी केलेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Web Title: girl arrange liquor party in her house, colleague friend raped her, commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.