Video : आवरा या तरुणीला! भररस्त्यात कॅब चालकाच्या कानाखाली लगावत केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:36 PM2021-08-03T14:36:57+5:302021-08-03T14:45:39+5:30

A girl assaulting to cab driver : त्या तरुणीने कारने धडक दिल्याचा आरोप कॅब चालकावर लावला. लखनऊ येथील अवध क्रॉसिंगजवळील सिग्नलकडे ही घटना घडली. 

A girl assaulting to cab driver in lucknow; The video went viral | Video : आवरा या तरुणीला! भररस्त्यात कॅब चालकाच्या कानाखाली लगावत केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Video : आवरा या तरुणीला! भररस्त्यात कॅब चालकाच्या कानाखाली लगावत केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देहा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. कॅब चालकाचे नाव सहदत अली असे आहे.  

कॅब ड्राईव्हरच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भररस्त्यात या तरुणीने हायव्होल्टेज ड्रामा केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. कॅब चालकाचे नाव सहदत अली असे आहे.  

या व्हिडिओमध्ये एक तरुणी रोड क्रॉस करताना अचानक एका कॅबच्या समोर आली. दरम्यान कॅब चालकाने कार थांबवली आणि भररस्त्यात त्या तरुणीने कॅब चालकाला कारमधून बाहेर काढले. नंतर कानाखाली लगावत बेदम मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या युवकाला देखील तरुणीने मारहाण केली. त्या तरुणीने कारने धडक दिल्याचा आरोप कॅब चालकावर लावला. लखनऊ येथील अवध क्रॉसिंगजवळील सिग्नलकडे ही घटना घडली. 

#ArrestLucknowGirl हा हॅशटॅग ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होतोय. लाखो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान हा गोंधळ सुरु असताना वाहतूक पोलीस देखील तिथे येतो. मात्र, तरुणी त्या पोलिसाला देखील जुमानत नाही. या तरुणीने कॅब चालकाचा मोबाईल देखील तोडला आहे. याप्रकरणी कृष्णानगर पोलीस ठाण्यात या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती एडीसीपी यांनी पोलिसांच्याट्विटर हॅण्डलवरून दिली आहे. 

 

 

Web Title: A girl assaulting to cab driver in lucknow; The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.