सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले; पीलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 07:12 AM2022-09-12T07:12:40+5:302022-09-12T07:13:10+5:30

यूपीपाठोपाठ बिहारमध्येही अत्याचाराची घटना 

Girl burnt alive after gang rape in Pilibhit | सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले; पीलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा

सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळले; पीलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा

Next

एस. पी. सिन्हा 
 
पाटणा : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात पाच युवकांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे, तर उत्तर प्रदेशात १६ वर्षीय दलित युवतीवर बलात्कार करून तिला जिवंत पेटवून दिले. या दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर आहे. 

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका गावात अल्पवयीन मुलीवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार करत व्हिडिओ व्हायरल केला. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. ही १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि शेजारच्या गावातील तिचा प्रियकर हे भेटण्यासाठी गावाच्या बाहेर पोहोचले होते. याचवेळी येथे पाच युवक दाखल झाले आणि या दोघांना पकडले. या मुलीवर तिच्या प्रियकरासमोर सामूहिक बलात्कार केला. याचा व्हिडिओ व्हायरल केला. 

पीलीभीतमध्ये माणुसकीला काळिमा 
उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात माधव तांडा परिसरात दोन युवकांनी एका दलिताच्या घरात घुसून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर या मुलीच्या अंगावर डिझेल टाकून आग लावली. यात ही मुलगी गंभीररीत्या भाजली. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलीस अधीक्षक दिनेश कुमार प्रभू यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी या मुलीला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पीडितेने हा प्रसंग सांगितला, त्याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या वडिलांनी १० सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, गावातील राजवीर आणि ताराचंद या युवकांनी घरात घुसून मुलीवर अत्याचार केला आणि डिझेल टाकून तिला पेटवून दिले. पॉक्सो, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. 

Web Title: Girl burnt alive after gang rape in Pilibhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.