स्मार्टफोन न मिळाल्याने मुलीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:05 AM2020-07-11T05:05:57+5:302020-07-11T05:06:13+5:30
स्मार्टफोनपायी आत्महत्या करण्याची त्रिपुरामधील या महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
आगरतळा : कोरोना साथीमुळे विविध राज्यांत शाळांत आॅनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी लागणारा स्मार्टफोन पालकांनी घेऊन न दिल्यामुळे त्रिपुरातील सेपाहीजाला जिल्ह्यातील एका मुलीने (वय १४ वर्षे) गुरूवारी आत्महत्या केली.
स्मार्टफोनपायी आत्महत्या करण्याची त्रिपुरामधील या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. शाळेने सुरू केलेल्या आॅनलाइन वर्गाना उपस्थित राहाण्यासाठी स्मार्टफोन आणून द्या असे या मुलीने आपल्या वडीलांना सांगितले होते. मात्र तिचे वडील हे मजूर असून रोजंदारीवर काम करतात. हातावर पोट असलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बिकट आहे. त्यामुळे वडीलांना आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करता आली नाही. त्यावरूनवादावादी झाली. परिणामी संध्याकाळी या मुलीने आत्महत्या केली.