'कलीम माझ्या मृत्यूला जबाबदार...', हातावर रेपिस्टचं नाव लिहून तरूणीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:50 PM2022-06-07T13:50:35+5:302022-06-07T13:50:48+5:30
Uttar Pradesh Crime News : तरूणीच्या घरातील लोकांना दिसलं की, तरूणीच्या दोन्ही पाय आणि हातांवर लिहिलं होतं की, कलीममुळे माझा मृत्यू झाला. कलीमचं नाव वाचताच तरूणीच्या घरातील लोक संतापले.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात शनिवारी एका तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली. तिला प्रयागराजच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जिथे तिचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याआधी एका तरूणावर गंभीर आरोप लावत तरूणीने हातावर लिहिलं होतं की, 'माझ्या मृत्यूला जबाबदार कलीम आहे'.
गेल्या शनिवारी 17 वर्षीय एका तरूणीने जीव देण्याचा निर्णय घेतला आणि तिने गळफास घेतला. तरूणीच्या घरात त्यावेळी कुणीच नव्हतं, पण शेजाऱ्यांना शंका आली तेव्हा ते तिच्या घरी गेले. त्यावेळी तरूणी गळफास घेऊन लटकली होती. तिला कसं तरी शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
तरूणीच्या घरातील लोकांना दिसलं की, तरूणीच्या दोन्ही पाय आणि हातांवर लिहिलं होतं की, कलीममुळे माझा मृत्यू झाला. कलीमचं नाव वाचताच तरूणीच्या घरातील लोक संतापले. पण अजूनही तरूणीचा श्वास सुरू होता. यावेळी तिचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं. कुटुंबियांनी पोलिसांना सूचना दिली.
कुटुंबियांनी सांगितलं की, 2 वर्षाआधी आरोपी कलीमने त्यांच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एक अश्लील व्हिडीओ बनवला होता. ज्यानंतर तो तिला नेहमीच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बोलवत होता आणि तिचं लैंगिक शोषण करत होता. एक दिवस हे सगळं तरूणीने घरातील लोकांना सांगितलं होतं.
त्यानंतर कुटुंबियांनी तरूणीला शिक्षणासाठी एका नातेवाईकांच्या घरी पाठवलं होतं. तरीही कलीमने तिचा पाठलाग केला आणि तिला धमक्या देत राहिला. वैतागून तरूणी शिक्षण सोडून घरी परत आली आणि एक दिवस घरात कुणी नसताना तिने गळफास घेतला.
तरूणीचं निधन झालं आहे. पोलिसांनी सांगितलं की, ही घटना 4 मे रोजीची आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.